पाहा VIDEO : कुत्र्याने स्विमिंग पूलमध्ये ढकलली मालकाची SUV कार

पाहा VIDEO : कुत्र्याने स्विमिंग पूलमध्ये ढकलली मालकाची SUV कार

कुत्र्यांमुळे मालकांना बऱ्याच वेळेला विचित्र परिस्थितीला सामोरं जावं लागतं. अशीच वेळ चीनमधल्या एका मालकावर आली. पूछ नावाच्या एका कुत्र्याने गाडीचा गिअर बदलला आणि ही गाडी थेट एका स्विमिंग पूलमध्ये गेली.

  • Share this:

बीजिंग, 19 डिसेंबर : कुत्र्यांमुळे मालकांना बऱ्याच वेळेला विचित्र परिस्थितीला सामोरं जावं लागतं. अशीच वेळ चीनमधल्या एका मालकावर आली. पूछ नावाच्या एका कुत्र्याने गाडीचा गिअर बदलला आणि ही गाडी थेट एका स्विमिंग पूलमध्ये गेली. चीनमध्ये घडलेल्या घटनेचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. इथल्या झिंजियांग प्रांतात झालेली ही घटना CCTV कॅमेऱ्यात चित्रित झाली.

या कारमालकाचं एक दुकान आहे. त्याने त्याची पांढरी SUV कार पार्क केली आणि त्याचं काही सामान घरातून आणण्यासाठी तो घाईघाईने गेला. त्यावेळी कारचं इंजिन चालूच होतं.

त्याचा कुत्रा पूछ गाडीतच बसला होता. त्याच्याकडून गाडीचा गिअर टाकला गेला आणि गाडी स्विमिंग पूलमध्ये पडली. जेव्हा या गाडीचा मालक परत आला तेव्हा त्याने त्याची गाडी स्विमिंग पूलमध्ये बुडलेली पाहिली. कुत्रा कसाबसा गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी एक फळी टाकून या कुत्र्याला बाहेर काढलं. कुत्रा तर सुरक्षित होता पण या गाडीचं काय झालं ते कळू शकलं नाही.

(हेही वाचा : तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलंय का? या कारणासाठी करावंच लागेल हे काम)

गेल्याच महिन्यात फ्लोरिडामध्येही अशीच एक कार रिव्हर्स गिअर पडल्याने गोलाकार फिरत होती. आसपासच्या रहिवाशांनी या गाडीत अडकलेल्या लॅब्रोडर कुत्र्याला वाचवलं.

(हेही वाचा : PPF मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पैसे काढण्याचे नियम बदलले)

======================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2019 06:36 PM IST

ताज्या बातम्या