मुंबई, 25 फेब्रुवारी : लवकरच उन्हाळा सुरू होत आहे. त्यामुळे गारव्यासाठी पंखे, कूलर किंवा एसी वापरण्याचं प्रमाण वाढेल. या उपकरणांमुळे विजेचा वापर वाढतो आणि वीजबिल जास्त येतं. अशा स्थितीत वीज वाचवण्याकरिता अनेक प्रयत्न केले जातात. वीज विचारपूर्वक वापरली जाते. पंखा पाचऐवजी तीन किंवा चारच्या स्पीडवर लावला तर वीजबिल कमी येतं, असा काहींचा समज असतो. उन्हाळ्यात प्रत्येक घरात पंखा वापरला जात असल्याने त्याबाबत अनेक संकल्पना तयार झाल्या आहेत; मात्र हे समज किती खरे आणि किती चुकीचे याचा शोध घेण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
पंख्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेचा संबंध त्याच्या स्पीडशी असतो; पण ही गोष्ट रेग्युलेटरवर अवलंबून असते. पंख्याच्या स्पीडमुळे विजेचा वापर कमी झाला की जास्त, ते रेग्युलेटरच्या आधारे समजू शकतं. परंतु, असे अनेक रेग्युलेटर आहेत, ज्यांचा वीजवापरावर कोणताही परिणाम होत नाही आणि ते केवळ पंख्याच्या स्पीडपुरतेच मर्यादित असतात. याचाच अर्थ पंख्याच्या स्पीडमुळे वीज वाचेल की नाही ते रेग्युलेटरच्या प्रकारावर अवलंबून असतं. अनेक फॅन रेग्युलेटर कमी व्होल्टेजचा वापर करून पंख्याचा स्पीड नियंत्रित करतात. दुसरीकडे काही रेग्युलेटर केवळ पंख्याचा स्पीड कमी करतात, त्यांना वीजवापराशी काही देणंघेणं नसतं.
काही फॅन रेग्युलेटर कमी व्होल्टेज वापरून पंख्याचा स्पीड नियंत्रित करतात. या रेग्युलटरचा वापर पंख्याला लागणारं व्होल्टेज कमी करण्यासाठी केला जातो. अशा प्रकारे पंखा कमी वीज वापरतो. परंतु, त्यामुळे विजेची बचत होत नाही. यात रेग्युलेटर केवळ रेझिस्टरसारखं कार्य करतो आणि पंखा गरजे इतकी वीज वापरतो. त्यामुळे पंख्याचा स्पीड कमी ठेवला तरी त्याचा विजेच्या वापरावर परिणाम होत नाही.
जुन्या रेग्युलेटरमध्ये पंख्याचा स्पीड कमी अथवा जास्त केल्याचा परिणाम विजेवर होत होता. हे रेग्युलेटर आकाराने मोठे होते. पण जसजसा तंत्रज्ञानात बदल होत गेला, तसा रेग्युलेटरमध्येही बदल झाला. आताचे रेग्युलेटर पूर्वीपेक्षा वेगळ्या तंत्रज्ञानावर काम करतात; मात्र आजही बाजारात पंख्याचा स्पीड नियंत्रित करून विजेची बचत साध्य करणारे रेग्युलेटर उपलब्ध आहेत. हे इलेक्ट्रॉनिक रेग्युलटर आहेत.
इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर्समुळे होते विजेची बचत?
आता इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर्सचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. या रेग्युलेटरमुळे विजेची बचत होते, असं मानलं जातं. पंख्याचा टॉप स्पीड आणि सर्वांत कमी स्पीड यादरम्यान विजेच्या वापरातला फरक इलेक्ट्रॉनिक रेग्युलटर वापरून तपासता येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Summer, Summer hot, Summer season