मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Egg and Diabetic : अंडी खाल्ल्यामुळे मधुमेहाचा धोका? जाणून घ्या याबाबतचं सत्य

Egg and Diabetic : अंडी खाल्ल्यामुळे मधुमेहाचा धोका? जाणून घ्या याबाबतचं सत्य

अंडी आणि मधुमेह याचा नेमका संबंध आहे का? याबाबत नुकतंच एक संशोधन झालं आहे.

अंडी आणि मधुमेह याचा नेमका संबंध आहे का? याबाबत नुकतंच एक संशोधन झालं आहे.

अंडी आणि मधुमेह याचा नेमका संबंध आहे का? याबाबत नुकतंच एक संशोधन झालं आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 29 डिसेंबर :  डायबेटिजचा संबंध शक्यतो गोड पदार्थांशी जोडला जातो. गोड पदार्थ खाल्ल्याने मधुमेह होतो असं म्हटलं जातं. पण नुकत्याच झालेल्या एका संशोधनात फक्त गोड पदार्थच नव्हे तर अंड्यामुळेही मधुमेहाचा धोका वाढतो असं दिसून आलं आहे.  म्हणजे गोड पदार्थ याचा परिणाम पुरुषांपेक्षा महिलांवर अधिक (Egg Consumption and Type 2 Diabetes) दिसून आला आहे.

बहुतेक लोकांना अंडी (Egg) ही नाश्त्यात खायला आवडतात. संशोधनानुसार जास्त अंडी खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जे लोक दररोज एक किंवा अधिक अंडी खातात, म्हणजे सुमारे 50 ग्रॅम, त्यांना मधुमेहाचा धोका 60 टक्क्यांनी वाढू शकतो.

'झी न्यूज'ने दिलेल्या बातमीनुसार, दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठाने (University of South Australia) चायना मेडिकल युनिव्हर्सिटी (China Medical University) आणि कतार युनिव्हर्सिटीच्या (Qatar University) भागीदारीत हा अभ्यास केला. हा Longitudinal Study 1991 ते 2009 या कालावधीत करण्यात आला. यामध्ये चीनमधील लोकांवर अंडी खाल्ल्याचा काय परिणाम होतो याबाबत पहिला अभ्यास करण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने प्रौढांचा सहभाग होता. सर्वेक्षण केलेल्या लोकांचे सरासरी वय 50 वर्षे होते. हा अभ्यास ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झाला आहे.

हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का?

शास्त्रज्ञांनी सांगितले की, जे लोक दररोज सरासरी 38 ग्रॅमपेक्षा जास्त अंडी खातात, त्यांना मधुमेहाचा धोका 25 टक्क्यांनी वाढतो. त्याच वेळी जे लोक 50 ग्रॅमपेक्षा जास्त अंडी खातात किंवा दिवसातून एक किंवा अधिक अंडी खातात त्यांचा मधुमेहाचा धोका 60 टक्क्यांनी वाढला. या परिणामांनुसार, अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. मात्र, अंड्याचे सेवन आणि मधुमेह यांचा काय संबंध आहे आणि कोणत्या कारणामुळे होतो, यावर आणखी संशोधनाची गरज असल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितले.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, अंडी खाणे आणि मधुमेहाचा धोका वाढणे हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. या अभ्यासात अंडी जास्त काळ खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, प्रक्रिया केलेले अन्न, जास्त प्रमाणात मांसाहारी गोष्टी, स्नॅक्स आणि आहारात उर्जायुक्त गोष्टी खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. या गोष्टींसोबतच आजकाल अंड्यांचे सेवनही वाढले आहे. ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

हे वाचा - हिरव्या मिरच्या चिरल्यामुळे तळहातांची जळजळ होतेय? या घरगुती उपायामुळे होईल त्रास कमी

एपिडेमियोलॉजिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ मिंग ली म्हणतात की, जर तुम्हाला टाइप 2 मधुमेह असेल तर त्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो, त्यामुळे आहारातील कोणत्या घटकांमुळे हा आजार होण्याची शक्यता वाढते, हे समजून घेणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Diabetes, Food, Health, Health Tips, Lifestyle