400 दिवसांपासून कोरोना रुग्णांची सेवा; पण व्हायरस या डॉक्टरला काहीच करू शकला नाही कारण...

400 दिवसांपासून कोरोना रुग्णांची सेवा; पण व्हायरस या डॉक्टरला काहीच करू शकला नाही कारण...

या डॉक्टरांनी स्वतःच आपल्याला कोरोनाची लागण का झाली नाही, याबाबत खुलासा केला आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 03 एप्रिल : कोरोना रुग्णांची (Coronavirus) सेवा करताना अनेक कोरोना योद्धा (Corona warriors) डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने विळखा घातला. बहुतेक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला. पण हे असे डॉक्टर आहेत जे गेल्या 400 दिवसांपासून म्हणजे जवळपास कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत. पण कोरोना त्यांना काहीच करू शकला नाही. याचं नेमकं कारण काय आहे.

गुजरातमधील (Gujrat) अहमदाबादच्या (Ahmedabad) सिव्हिल रुग्णालयात अतिरिक्त अधीक्षक डॉ. रजनीश पटेल (Dr. Rajneesh Patel) 400 दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करत आहेत, त्यांच्या संपर्कात येत आहेत. पण तरी त्यांना कोरोनाव्हायरसची लागण झालेली नाही.

हे वाचा - Corona vaccination : लस घेतल्यानंतरही काही लोकांना कोरोनाचा संसर्ग का होतो?

कोरोनाव्हायरसची साथ आल्यापासून तसे बरेच अभ्यास झाले आणि अद्यापही सुरू आहेत. त्यापैकी एक म्हणजे विशिष्ट रक्तगटाच्या (Blood group) व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी आहे आणि हा रक्तगट म्हणजे ओ पॉझिटिव्ह (O Blood group) आणि रजनीश यांना रक्तगटही ओ पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे खरंच ओ पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना कोरोना संसर्ग होत नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.

न्यूज 18 गुजरातीशी बोलताना डॉ. रजनीश पटेल यांनी सांगितलं, ओ पॉझिटिव्ह ब्लड चागलं असतं. माझं ब्लडग्रुपही ओ पॉझिटिव्ह आहे. पण तरी ओ पॉझिटिव्ह आहे म्हणून कोरोना होणार नाही, लोकांनी असा समज करून घेऊ नये. असा काही अभ्यास झालेला नाही कि ओ पॉझिटिव्ह रक्तगट आहे म्हणजे कोरोना होणार नाही. आपण ठोसपणे असं सांगू शकत नाही.

हे वाचा - Corona Vaccination : कोरोना लस घेतल्यानंतर SEX करू शकतो का?

कोरोनाविरोधात लढण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आहे. जेव्हापासून कोरोनाची महासाथी आली आहे, तेव्हापासून मी कोरोनासंबंधी नियमांचं पूर्णपणे पालन केलं आहे. रुग्णालयात आणि घराबाहेर मी मास्क लावतो आणि सोशल डिस्टन्सिंगही राखतो. त्यामुळे कोरोना संसर्गापासून मी सुरक्षित आहे. शिवाय लसीकरण कोरोनाविरोधात सुरक्षा देईल, असंही त्यांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: April 3, 2021, 4:29 PM IST

ताज्या बातम्या