Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

स्वतःचेच स्पर्म वापरून हा डॉक्टर बनला शेकडो मुलांचा बाप! मुलांनाच नव्हे, पालकांनाही नव्हती कल्पना

स्वतःचेच स्पर्म वापरून हा डॉक्टर बनला शेकडो मुलांचा बाप! मुलांनाच नव्हे, पालकांनाही नव्हती कल्पना

स्पर्म डोनेशनचं तंत्रज्ञान अनेकांसाठी वरदान बनले आहे. मात्र त्यातून काही धोकेही उद्भवू शकतात. असाच एक प्रकार आता समोर आला आहे.

स्पर्म डोनेशनचं तंत्रज्ञान अनेकांसाठी वरदान बनले आहे. मात्र त्यातून काही धोकेही उद्भवू शकतात. असाच एक प्रकार आता समोर आला आहे.

स्पर्म डोनेशनचं तंत्रज्ञान अनेकांसाठी वरदान बनले आहे. मात्र त्यातून काही धोकेही उद्भवू शकतात. असाच एक प्रकार आता समोर आला आहे.

  • Published by:  News18 Desk

मिशिगन, 19 डिसेंबर : वंध्यत्वाची समस्या असलेल्या जोडप्यांना अनेकदा स्पर्म डोनर्स (sperm donor) मूल जन्माला घालण्यासाठी मदत करू शकतात. हे वास्तव आता सर्वमान्य झाले आहे. त्यावर विकी डोनरसारखा सिनेमाही येऊन गेला. मात्र स्पर्म डोनेशनसंबंधाने एक विचित्र घटना मिशिगनमध्ये घडल्याची शक्यता आहे.

'द सन'ने (the sun) दिलेल्या वृत्तानुसार, एका प्रतिष्ठित फॅमिली डॉक्टरने (family doctor) पालकांच्या नकळत, स्वत:चे स्पर्म वापरून शेकडो बाळांना जन्म दिला असल्याची शक्यता आहे.

डॉ. फिलीप पेवन डेट्रॉइट, मिशिगन इथं राहतात. त्यांनी आपल्या ४० वर्षांच्या कार्यकाळात असंख्य महिलांची बाळांतपणं करत तब्बल ९००० बाळांना या जगात आणलं. दरम्यान गोष्ट अशी घडला, की काही भावंडांनी मिळून ऑनलाइन डीएनए चाचणी केली. त्यात त्यांना त्यांचे डीएनए पेवन यांच्या डीएनएशी मिळतेजुळते असल्याचं लक्षात आलं. पेवन हे त्यांच्या वडिलांचे डॉक्टर होते. आता पेवन हेच आपले वडिल असल्याची शक्यता या मुलांनी वर्तवली आहे.

या भावंडांपैकी एकजण, जेमी हॉल, ही डिसेंबर २०१९ मध्ये पेवन यांच्याकडे गेली. या भेटीत पेवन यांनी ते जेमीचे वडिल असून त्यांनी स्वत:चे स्पर्म्स वापरत आणखीही बरीचं बाळं जन्माला घातल्याची कबूली दिली. स्त्रीरोगतज्ञासह स्पर्म डोनर म्हणून काम करताना त्यांंनी हे केल्याचं त्यांनी कबूल केलं.

जेमीचे पालक आता हयात नाहीत. तिनं सांगितलं, 'पेवन आमचे फॅमिली फ्रेंड होते. त्यांनी स्वत:चे स्पर्म वापरल्याची माझ्या पालकांना किंचीतही कल्पना नव्हती. शिवाय तिनं टेस्ट केल्यावर आणखीही अनेकांसोबत तिचे डीएनए जुळले.' पेवनच्या माध्यमातून जन्मलेली आणखीही अनेक भावंडं सापडतील असा तिचा अंदाज आहे. जेमी पुढे सांगते, 'आमच्या सर्वांचा जन्म एकाच दवाखान्यात झाला. आमच्या जन्म दाखल्यांवर वडिल म्हणून नाही तर डॉक्टर म्हणून पेवन यांचे नाव आहे.'

23 and me आणि ancestry.com या दोन सेवांच्या माध्यमातून जेनीनं हा शोध लावला. २००८ पर्यंत जेमीला आपले पालक कोण आहेत याची शंका आली नव्हती. मात्र एकदा तिच्या सावत्र बहिणीनं जेन आणि तिची मोठी बहिण लिनला सांगितलं, की त्यांना मोठं करणारा माणूस हा त्यांचा जैविक पिता नव्हता. मग तिनं २०१७ मध्ये पितृत्व चाचणी केली त्यात हे सत्य समोर आलं. जेनच्या म्हणण्यानुसार पुढच्या काळात तिला असंख्य फोन आणि इमेल आले ज्यात त्या व्यक्तींनी त्यांचे डीएनए जेनशी मिळतेजुळते असल्याचा दावा केला.

डॉ. पेवनचं वय आता १०४ वर्ष असून ते अजूनही मिशीगनमध्ये राहतात. त्यांनी या कृत्याबाबतची कबुली या सगळ्या व्यक्तींना दिली आहे. या धक्क्यानंतरही जेम आणि लेन या घटनाक्रमाकडे सकारात्मक पद्धतीनेच पाहतात.

First published:

Tags: Pregnant woman