मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हिवाळ्यात होणाऱ्या विविध ॲलर्जीपासून असा करा स्वतःचा बचाव, माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेने यांनी सांगितले उपाय

हिवाळ्यात होणाऱ्या विविध ॲलर्जीपासून असा करा स्वतःचा बचाव, माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेने यांनी सांगितले उपाय

आपल्या व्हिडिओमध्ये डॉ. नेने (Dr. Nene) सांगतात, की ॲलर्जीपासून बचावासाठी आपल्याला स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे.

आपल्या व्हिडिओमध्ये डॉ. नेने (Dr. Nene) सांगतात, की ॲलर्जीपासून बचावासाठी आपल्याला स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे.

आपल्या व्हिडिओमध्ये डॉ. नेने (Dr. Nene) सांगतात, की ॲलर्जीपासून बचावासाठी आपल्याला स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे.

नवी दिल्ली 22 डिसेंबर : हिवाळ्यामध्ये एकीकडे गुलाबी थंडी असल्यामुळे अगदी सुंदर असं वातावरण असतं. तर दुसरीकडे याच थंडीमुळे कित्येक जणांना सर्दी-पडसं असे आजार होण्यास सुरूवात होते. केवळ सर्दीच नाही, तर हिवाळ्यात इतरही बऱ्याच समस्यांना (Health issues during winter) सामोरं जावं लागतं. यामध्ये मग ॲलर्जीमुळे वारंवार शिंका येणं, खाज सुटणं अशा गोष्टींचाही समावेश आहे. खरं तर बाकी गोष्टींमुळे ॲलर्जीकडे (Allergies in winter) बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं. कित्येक वेळा येणाऱ्या शिंका या सर्दीमुळे असल्याचा समज झाल्यामुळे, त्यावर सर्दीचे उपाय केले जातात. मात्र, वेळीच ॲलर्जी ओळखून (Detect allergies) त्यावर उपाय करणं गरजेचं आहे. याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. वयाच्या तिशीनंतर या डाळी खाणं आहे आवश्यक; जाणून घ्या आरोग्याला मिळणारे फायदे हिवाळ्यामध्ये फुलांमध्ये परागसिंचन (Pollination) अधिक प्रमाणात होते. या प्रक्रियेत निर्माण होणारे परागकण हे हवेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. हे परागकण नाकात गेल्यामुळे कित्येक वेळा आपल्याला ॲलर्जी (What causes allergy) होते. या ॲलर्जीपासून कसा बचाव करायचा, आणि त्यावर काय उपाय करायचा याबाबत बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) पती डॉ. श्रीराम नेने (Shriram Nene) यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर सविस्तर माहिती दिली आहे. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. आपल्या व्हिडिओमध्ये डॉ. नेने (Dr. Nene) सांगतात, की ॲलर्जीपासून बचावासाठी आपल्याला स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे. हिवाळ्यात सहसा आपण भरपूर चादरी, ब्लँकेट्स वापरतो. या गोष्टींची आणि बेडशीट, पिलो कव्हर अशा गोष्टींचीही नियमित स्वच्छता (Cleaning must to avoid allergies) गरजेची आहे. यासोबतच आपल्या शरीराची स्वच्छताही गरजेची आहे. विशेषतः आपले नाक अधिकाधिक स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. अशा प्रकारे करा नाकाची स्वच्छता डॉ. नेने यांनी आपल्या व्हिडिओमध्ये नाकाची स्वच्छता (How to clean nose) करण्याची एक सोपी पद्धतही सांगितली आहे. यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन, तुम्हाला त्यात तुमचे नाक बुडवायचे आहे. असे केल्यामुळे नाकाच्या आत जर काही परागकण अडकले असतील, तर ते निघून जातात. असे केल्यानंतर तुमची ॲलर्जी कमी होईल. तसे न झाल्यास, आपण एखाद्या विशिष्ट फुलाच्या संपर्कात आल्यानंतरच ॲलर्जी (Allergies from flower) होत आहे का हे तपासा. तसेच, प्रत्येक हिवाळ्यातच तुम्हाला ॲलर्जी (Winter allergies) होत असेल, तर या काळात घरातून बाहेर जाणे कमी करण्याचा सल्लाही नेने यांनी दिला.

तुमच्यात दिसणार ही लक्षणं म्हणजे Vitamin B12 Deficiency

घरगुती उपायांनी एलर्जी कमी होत नसेल, तर थेट स्टेरॉईड घेऊ नका असा इशाराही नेने यांनी आपल्या व्हिडिओतून दिला. स्टेरॉईड हे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला हवेत. कारण आपल्याला नेमकी कशाची आणि कोणत्या प्रकारची ॲलर्जी आहे, हे केवळ डॉक्टरांच्या तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकते. तुम्ही डॉक्टरांकडे जाल तेव्हा त्यांना आपल्या ॲलर्जीबाबत पूर्ण माहिती द्या, जेणेकरून ते उपचारांची दिशा ठरवू शकतील, असंही नेने यांनी सांगितले. कित्येक वेळा डॉक्टर ॲलर्जीबाबत माहिती करून घेण्यासाठी ब्लड टेस्ट (Tests to detect allergies) करतात. तसेच, स्किन ॲलर्जेन टेस्ट (Skin allergen test) या चाचणीच्या मदतीनेही ॲलर्जीबाबत माहिती मिळू शकते. या चाचणीमध्ये व्यक्तीच्या त्वचेवर विविध ॲलर्जेन ठेवले जातात. ज्या ॲलर्जेनची त्वचेवर रिएक्शन दिसून येईल, त्यापासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात. एकूणच, हिवाळ्यामध्ये सर्दी पडसे अशा आजारांसोबतच इतर गोष्टींचीही काळजी घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे तुम्हालाही जर सर्दीशिवाय शिंका येणे किंवा इतर त्रास होत असतील, तर नक्कीच त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
First published:

Tags: Madhuri dixit, Winter

पुढील बातम्या