#डॉक्टरRx- थंडीच्या दिवसांमध्ये अशी घ्या आपल्या त्वचेची काळजी

#डॉक्टरRx- थंडीच्या दिवसांमध्ये अशी घ्या आपल्या त्वचेची काळजी

निरोगी त्वचेसाठी बाहेरील स्वच्छतेसोबत योग्य आहारही तेवढाच महत्त्वाचा आहे.

  • Share this:

मुंबई, २७ नोव्हेंबर २०१८- जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर मधील सल्लागार त्वचा विशेषज्ञ डॉ. मैथिली कामत यांनी त्वचेची योग्य काळजी कशी घ्यावी याच्या टिप्स दिल्या आहेत.

दिवसभर आपल्या चेहऱ्यावर प्रचंड धूळ जमा होतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. तुम्ही कितीही थकलेले किंवा कंटाळलेले असलात तरी रात्री सौम्य साबणाने झोपण्यापूर्वी चेहरा धुवा.

मेकअप तसाच ठेवून कधीही झोपू नका.

झोपायच्या वेळेस त्वचेला मॉइस्चराइज करा.

रात्री त्वचेला मुलायम बनवण्यासाठी क्रीम किंवा सीरम वापरा.

ओठांवरील त्वचेचे आरोग्य पुनः चांगले करण्यासाठी सतत लीप बाम लावा.

डोळ्याखालील भागाला विसरू नका. डोळ्याभोवतालची त्वचा सर्वात नाजूक असते. तसेच सर्वात आधी वृद्धतेची चिन्हं डोळ्यांभोवतीच दिसून येतात. त्यामुळे डोळे हायड्रेटेड राहतील याची काळजी घ्या.

#डॉक्टरRx या नव्या सीरिजमधून आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. #डॉक्टरRx डॉक्टर अनेकदा न कळणाऱ्या अक्षरांमध्ये प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. आम्ही मात्र तुम्हाला कळेल आणि समजेल या भाषेतच डॉक्टरRx म्हणजे प्रिस्किप्शन देत आहोत. आरोग्याशी निगडीत तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्हीही ते आम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. आम्ही तुमच्या शंकांचं निरसन डॉक्टरांकडून करून घेण्याचा प्रयत्न करू.

मेकअप करून झोपू नका- मेकअप पूर्णपणे काढून टाका. मेकअप काढण्यासाठी चांगल्या प्रोडक्टचा वापर करा.  मेकअप काढण्यासाठी मेकअप विप्स वापरत असल्यास, विपिंग प्रक्रियेदरम्यान चेहऱ्यावर जास्त दाब देऊ नका. हलक्या हाताने मेकअप काढा. त्वचेवर जोर दिल्याने हायपर पिग्मेंटेनेशन होऊ शकते.

शक्यतो दिवसातून तीन ते चार वेळा चेहऱ्या स्वच्छ पाण्याने धुवावा. तसेच साबणाचा जास्ती वापर करू नये.

मुरमांचा त्रास असेल तर सॅलिसिक असिड किंवा बेंझॉयल पेरोक्साइड असलेले क्लिझर दिवसातून एकदाच वापरावं

त्वचा मॉइस्चराइज ठेवा- त्वचेचा प्रकार कोणताही असो फेसवॉशनंतर लगेच मॉइस्चराइज करावं. त्वचेच्या प्रकारानुसार मॉइस्चरायझरची निवड करावी. तेलकट त्वचेसाठी हलक्या हाताने आणि कोरड्या त्वचेसाठी जोर देऊन स्क्रब करावे. शक्यतो पाणी आधारित मॉइस्चराइजरचा वापर करावा.

निरोगी त्वचेसाठी बाहेरील स्वच्छतेसोबत योग्य आहारही तेवढाच महत्त्वाचा आहे.

शक्यतो रात्रीचं जेवण हलकं आणि पोषक असावं.

कमी-जीआय मूल्य खाद्यपदार्थ खाल्ल्याने ते फार उशीराने पचतात. यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये हलकीशी वाढ होते.

दुसरीकडे, कमी जीआय व्हॅल्यू असलेले अन्न मर्यादित प्रमाणात खावं . कारण ते पचायला हलके असतात. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतंही आणि कमीही होतं.

भरपूर ताजी फळं खावीत. जेवणात भाज्यांचा जास्तीत जास्त समावेश करावा. तसंच बटाटे आणि साखरेचं आहारातलं प्रमाण कमी असावं.

First published: November 27, 2018, 8:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading