News18 Lokmat

#Doctor Rx- तुम्हीही अर्धशिर्षीच्या त्रासाने त्रस्त असाल तर हे एकदा वाचाच

अर्धशिर्षीमध्ये मेंदूचा एक विशिष्ट भाग अतिप्रमाणात दुखायला लागतो. हे डोकंदुखीपेक्षा अधिक भयंकर आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 15, 2018 09:13 AM IST

#Doctor Rx- तुम्हीही अर्धशिर्षीच्या त्रासाने त्रस्त असाल तर हे एकदा वाचाच

जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर मधील सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. पृथ्वीराज दाबरसे यांनी अर्धशिर्षी का होते आणि त्यामागे काय कारणं असतात याबद्दल सखोल सांगितले आहे.


अर्धशिर्षी का होते?


अर्धशिर्षी ही एक प्रकारची प्राथमिक डोकेदुखी आहे. सर्वसामान्यपणे १५ -२०  टक्के लोकांना अर्धशिर्षीचा त्रास असतो. मात्र ते त्याला डोकेदुखी असंच नाव देतात. अनुवंशिकतेमुळे किंवा सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अर्धशिर्षीचा त्रास होतो. अर्धशिर्षीमध्ये मेंदूचा एक विशिष्ट भाग अतिप्रमाणात दुखायला लागतो. हे डोकंदुखीपेक्षा अधिक भयंकर आहे. यात त्रासही फार होतो.

Loading...


अर्धशिर्षीचं लक्षणं काय? हे डोकेदुखीपेक्षा कसे वेगळे आहे?


अर्धशिर्षीच्या सामान्य लक्षणांमध्ये डोक्याचा संपूर्ण भाग किंवा अर्धा भाग दुखतो. ऊन, कर्कश आवाज, दुर्गंध, मळमळ किंवा उलट्या यांसारख्या संवेदनक्षमतेशी संबंधित गोष्टींमुळे अर्धशिर्षीचा त्रास होतो.


ही लक्षणं काही मिनिटांत हळू हळू वाढतात आणि काही तास टीकू शकतात. बऱ्याच वेळा पेनकिलर किंवा औषधांची आवश्यकता असते. झोपेत सामान्यत: त्रास होत नाही. पण, अर्धशिर्षीमुळे नीट झोप लागत नाही. त्यामुळे मध्येच झोप मोड होऊ शकते. अर्धशिर्षीची पुनरावृत्ती सामान्य डोकेदुखीशिवायसुद्धा होऊ शकते. बऱ्याचदा आपण सामान्य डोकेदुखी किंवा ऍसिडिटी हे अर्धशिशीचा एक भाग असू शकते.


प्रक्रिया केलेले पदार्थ अर्धशिर्षी वाढवू शकतं का?


होय प्रिझर्व्हेटिव्ह तसेच प्रक्रिया केलेले अन्न विशेषतः फ्रिज, मायक्रोवेव्ह आणि रेडीमेड प्रकारचे पदार्थ खाल्यामुळे अर्धशिर्षीचा त्रास वाढू शकतो. तसेच चायनीज अन्न ज्यामध्ये अजिनोमोटो आणि मोनोसोडियम ग्लूटामेट, खूप चीज, डार्क चॉकलेट असते त्यामुळेही अर्धशिर्षीचा त्रास निर्माण होऊ शकतो तसेच वाढू शकतो. सतत डोक्यावरुन आंघोळ केल्याने आणि एसीमध्ये खूप काळ बसल्यानेही अर्धशिर्षीचा त्रास वाढू शकतो. अनियमित मासिक पाळीमुळेही स्त्रियांमध्ये अर्धशिर्षीचा त्रास वाढतो.


एखाद्याने अर्धशिर्षीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय खावं?


घरगुती ताजी फळं, भरपूर भाज्या आणि घरचं ताजं जेवण घ्यावं. तसंच दोन्ही वेळचं जेवण ठरवलेल्या वेळीच घेणं महत्त्वाचं आहे.


अर्धशिर्षी कमी करण्यासाठी काही व्यायाम आहेत का?


माइग्रेनसाठी काही खास व्यायाम नाहीत. पण शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणं फार महत्वाचं आहे. दररोज ३५ ते ४५  मिनिटं आणि आठवड्यातून ५ ते ६ वेळा व्यायाम करणं गरजेचं आहे. पोहण्यामुळेही अर्धशिर्षीचा त्रास कमी होऊ शकतो. तसेच योग आणि प्राणायाममुळेही अर्धशिर्षी नियंत्रणात राहते. मात्र व्यायाम करताना डोक्याच्या भागावर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.


अर्धशिर्षी वाढण्याची सामान्य कारणं काय?


सामान्यपणे कमी झोप, जेवणाची टाळाटाळ, उन्हामध्ये काम, शारीरिक आणि मानसिक तणाव तसेच वारंवार प्रवास यांमुळे अर्धशिर्षीचा त्रास सुरू होतो आणि नंतर तो वाढत जातो. तसेच आहारामुळेही अर्धशिर्षीचा त्रास सुरू होतो.


अर्धशिर्षीसाठी सर्वोत्तम उपाय कोणते?


निरोगी जीवनशैलीसाठी, भरपूर प्रमाणात पाणी  पिणं, वेळेवर जेवण, पुरेशी झोप आवश्यक आहे. घराबाहेर पडताना शक्यतो सनग्लासेस वापरा. तसेच न्यूरोलॉजिस्टचा सर्वात आधी सल्ला घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2018 09:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...