निष्काळजीपणाचा कळस! डॉक्टरांची मोठी चूक, सहाव्या महिन्यात भंगलं आई होण्याचं स्वप्न

निष्काळजीपणाचा कळस! डॉक्टरांची मोठी चूक, सहाव्या महिन्यात भंगलं आई होण्याचं स्वप्न

पोलिसांच्या मते, मेडिकल चार्टमध्ये गडबड आणि रुग्णाच्या ओळखीत चूक झाल्यामुळे डॉक्टरांनी चुकीच्या महिलेचं गर्भपात केला.

  • Share this:

डॉक्टरांच्या निष्काळर्जीपणा रुग्णाचं आयुष्य बदलवून टाकू शकतं. दक्षिण कोरियात होत्याचं नव्हतं करणारी अशीच एक घटना घडली. 7 ऑगस्टला एक गरोद महिला गॅग्सियो येथील एका रुग्णालयात गेली होती. पोलिसांच्या मते, मेडिकल चार्टमध्ये गडबड आणि रुग्णाच्या ओळखीत चूक झाल्यामुळे डॉक्टरांनी चुकीच्या महिलेचं गर्भपात केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून क्लिनीकमधील डॉक्टर आणि परिचारिकांची तपासणी केली जात आहे. दोघांनीही आपली चूक मान्य केली असून त्यांच्यावर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, गरोदर महिलेला न्यूट्रीशनल शॉट द्यायचे होते. मात्र परिचारिकेने रुग्णाची योग्य माहिती न पाहताच तिला एनेस्थेशियाचं इंजेक्शन दिलं. एवढंच नाही तर डॉक्टरांनीही निष्काळजीपणाने महिलेचं गर्भपात केलं. गरोदर महिलेला तिच्यासोबत काय होत आहे याची कल्पनाही नव्हती.

एका वर्षात दक्षिण कोरियात गर्भपाताची 50 हजार प्रकरणं आली समोर

पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली असून दक्षिण कोरियातील कायद्यानुसार, अशा प्रकारे गर्भपात करणं बेकायदेशी आहे. यात वर्षभराचा तुरुंगवासही होऊ शकतो. असं म्हटलं जातं की, गेल्या वर्षभरात दक्षिण कोरियात गर्भपाताच्या 50 हजार प्रकरणं समोर आली आहेत. आरोग्य मंत्रालयानेही या आकड्यांवर शिक्कामोर्तब केलं आहे. गर्भपाताचे आकाडे याहून जास्त असू शकतात असंही म्हटलं जात आहे.

टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणं वेळीच थांबवा, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप!

आजच मोडा जेवणानंतर पाणी पिण्याची सवय, होतील गंभीर आजार

पितृपक्षाच्या महिन्यात चुकूनही ही 7 कामं करू नका!

फ्रॅक्चर झालंय? या प्रोटीनपासून रहा सावधान, होऊ शकतं नुकसान!

VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

Published by: Madhura Nerurkar
First published: September 25, 2019, 2:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading