पोटदुखीवर डॉक्टरनं महिलेला लिहून दिलं औषध, निघालं कंडोम!

एका डॉक्टरनं एक महिला पेशंटला औषधाऐवजी कंडोमचं नाव लिहून दिल्यानं खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 03:13 PM IST

पोटदुखीवर डॉक्टरनं महिलेला लिहून दिलं औषध, निघालं कंडोम!

रांची, 29 जुलै : एका डॉक्टरनं एक महिला पेशंटला औषधाऐवजी कंडोमचं नाव लिहून दिल्यानं खळबळ उडाली आहे. यामुळे त्या डॉक्टरलाही मेडिकल टीमच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. झाराखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील घाटशिला सरकारी हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. एका चतुर्थ श्रेणी महिला कर्मचारी 23 जुलैला पोटात दुखत असल्यानं उपचारांसाठी डॉ असफर बदर यांच्याकडे गेली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हॉस्पिटलमध्ये कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या या डॉक्टरनं पोटदुखीचं औषध लिहून दिलं होतं.

डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतायत, मग करा 'हे' घरगुती उपाय

यानंतर ही महिला औषध देण्यासाठी मेडिकलमध्ये गेली त्यावेळी तिला दुकानदारानं डॉक्टरनी लिहून दिलेलं औषध हे कंडोम आहे असं सांगितलं. त्यामुळे चिडलेल्या महिलेनं या प्रकाराची वरिष्ठ डॉक्टरांकडे तक्रार केली. त्यानंतर हा मुद्दा झाराखंड मुक्ती मोर्चाचे विधायक कुणाल सारंगी यांनी विधानसभेत मांडला. या महिलेनं केलेल्या तक्रारीनंतर या हॉस्पिटलमध्ये एका मानसोपचार तज्ज्ञ आणि मेडिकल टीमची स्थापना करण्यात आली.

फक्त दीड हजार रुपयांत मिळतं युरोपातील या सुंदर शहराचं नागरिकत्व

या मेडिकल टीमनं रविवार पासून या प्रकरणाची चौकशीला सुरुवात केली आहे. घाटशिला सब डिव्हिजनल हॉस्पिटलचे प्रमुख शंकर टुडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, संबंधीत महिलेच्या तक्रारी नुसार एक मेडिकल टीमची स्थापना करण्यात आली असून त्यांच्याकडू या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जात आहे. तर दुसरीकडे आरोपी डॉक्टरशी याबाबत संवाद साधला असता त्यानं मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

Loading...

यामुळे पतीपासून दूर होत आहे पत्नी, पुरुषांनी जाणून घेतले पाहिजे हे कारण...

=========================================================

आज कुछ तुफानी करते है! शिवेंद्रराजेंचं चित्तथरारक जिप्सी ड्रायव्हिंग, VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 03:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...