Home /News /lifestyle /

सतत कॉम्प्युटर समोर बसून काम करताय? थोडावेळ असा द्या हाताच्या बोटांना आराम

सतत कॉम्प्युटर समोर बसून काम करताय? थोडावेळ असा द्या हाताच्या बोटांना आराम

कोरोनामुळं शाळा-महाविद्यालयंदेखील बंद असल्यानं ऑनलाईन लेक्चर्स घेतली जातात. मुलांच्या ऑनलाईन क्लासेसपासून (Online Classes) ते ऑफिस मीटिंग्जसाठी (Office Meetings) सध्या मोबाईल आणि कॉम्प्युटरशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.

नवी दिल्ली, 15 जानेवारी: जवळपास गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनानं (Corona) धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आलं होतं. लॉकडाऊनमध्ये ज्या कंपन्यांना घरून काम करून घेणं शक्य होत त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'चा (Work From Home) पर्याय खुला करून दिला. आता अनलॉक झालेलं आहे तरी देखील अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय सुरू ठेवला आहे. याशिवाय कोरोनामुळं शाळा-महाविद्यालयंदेखील बंद असल्यानं ऑनलाईन लेक्चर्स घेतली जातात. मुलांच्या ऑनलाईन क्लासेसपासून (Online Classes) ते ऑफिस मीटिंग्जसाठी (Office Meetings) सध्या मोबाईल आणि कॉम्प्युटरशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. मात्र, अनेकांसाठी हा पर्याय मनस्ताप वाटू लागला आहे. प्रदीर्घकाळ कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर काम केल्यामुळं अनेकांना शारीरीक आरोग्याच्या (Physical Health) समस्या जाणवू लागल्या आहेत. सततच्या टायपिंगमुळं हात, खांदे, पाठदुखी आणि डोळ्यांच्या समस्या सुरू झाल्या आहेत. टायपिंगमुळं (Typing) हाताची बोटंसुद्धा अखडल्यासारखी होतात. बोटांच्या दुखण्यापासून (fingers pain) कशी सुटका मिळवायची यासाठी काही सोपे उपाय (Tips) आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. ठराविक काळानंतर हातांना स्ट्रेच करा अनेकदा आपण कामात इतके मग्न होतो की तासनतास कॉम्प्युटरसमोर बसून राहतो. आपण किती कॉम्प्युटरसमोर किती वेळ घातला आहे याचीही जाणीव होत नाही. नंतर मात्र, आपल्या शरीरावर (Body) आणि आरोग्यावर (Health) त्याचा थेट परिणाम दिसून येतो. त्यामुळं सतत एकाजागी बसून तासनतास काम करणं टाळलं पाहिजे. काम टाळलं पाहिजे म्हणजे हातातील काम बंद करणं असा याचा अर्थ होत नाही. हेही वाचा-  दारूबंदी असलेल्या राज्यात विषारी दारू;  5 जणांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर कामाच्या दरम्यान मिळणाऱ्या लंच (Lunch) आणि टी ब्रेकमध्ये (Tea Break) किंवा मध्ये थोडा वेळ मिळाल्यास हाताची बोटं स्ट्रेच करा. काम करतानाही अधून-मधून हातीच्या मुठीची उघडझाप केल्यास बोटांच्या दुखण्यापासून आराम मिळेल. कॉम्प्युटर (Computer) आणि लॅपटॉपची (Laptop) पोझिशन थेट तुमच्या बोटांशी संबंधित असते. कुठेही बसून काम करण्याच्या सवयीमुळं आपल्या शरीरासोबतच बोटांवरही परिणाम होतो. त्यामुळं ज्याठिकाणी बसून टाईप करताना त्रास होणार अशा ठिकाणी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर ठेवावं. यासाठी टेबल आणि खुर्ची हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. हातांवर जास्त ताण देऊ नका अनेक वेळा आपण आपल्या सोयीनुसार बेडवर पडून किंवा कुठेही बसून काम सुरू करतो. त्यामुळे आपल्या हातांवर दाब येतो आणि बोटांमध्ये वेदना होतात. म्हणूनच बोटांना विश्रांती देण्यासाठी हातांच्या पोझिशनची काळजी घेणं फार महत्वाचे आहे. ज्या पोझिशनमुळं आपल्या हातांवर आणि बोटांवर जास्त ताण पडणार नाही, अशा पोझिशनमध्ये बसून काम करावं.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Lifestyle, Online

पुढील बातम्या