Home /News /lifestyle /

Big B Amitabh Bachchan यांच्यासारखा भारदस्त आवाज काढणं आता कठीण नाही; डॉक्टरला उपाय सापडला

Big B Amitabh Bachchan यांच्यासारखा भारदस्त आवाज काढणं आता कठीण नाही; डॉक्टरला उपाय सापडला

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आवाजाची नक्कल करताना आता तुमच्या आवाजातही तो भारदस्तपणा येईल.

    अंकारा, 20 मे : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan voice) यांच्या भारदस्त आवाजाचे कित्येक लोक दिवाने आहेत. कित्येकांनी त्यांचे फिल्मी डायलॉग्स त्यांच्याच आवाजात बोलण्याचा प्रयत्नही केला असेल. काही लोक सेलिब्रेटींचे आवाज काढण्यात पटाईत असतात. अशा मोजक्यात मिमिकरी आर्टिस्ट्सना अमिताभ बच्चन यांच्या आवाजाची नक्कल करता येते. पण तरी त्यांच्या आवाजात तो भारीपणा येत नाही. अमिताभ बच्चन यांच्यासारखा आवाज मिळवण्यासाठी नवाच जन्म घ्यावा लागेल, असं काही जण म्हणतात. पण आता या नव्या जन्माची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. याच तुमची ही इच्छा पूर्ण होईल. तुम्हालाही अमिताभ यांच्यासारखा भारदस्त आवाज मिळू शकतो (Voice surgery). एका डॉक्टराने आवाज भारी करण्याचा उपाय शोधला आहे. सर्जरी करून हा डॉक्टर लोकांचा आवाज भारी करतो  (Doctor perform surgery to deepen voice). तुर्कस्तानातील डॉक्टर कुर्सत येलकेन (Dr Kursat Yelken)  गेल्या 15 वर्षांपासून सर्जरी करून लोकांचा आवाजात भारदस्तपणा आणण्याचं काम करत आहेत. रिपोर्टनुसार त्यांच्याकडे बरेच लोक आपला रिअल वॉईस बदलण्यासाठी येतात. त्यांनी एका वर्षात 100 ते 150 लोकांच्या सर्जरी केल्या आहेत. ही सर्जरी बऱ्यात कालावधीपासून आहे पण लोकांच्या लक्षात आली नाही, असं त्यांनी सांगितलं. हे वाचा - 2 मुलं होताच लठ्ठ झाली बायको; नवऱ्याने तिच्या शरीरावर 'चाकू' फिरवला आणि झाला चमत्कार डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेत मानेच्या खालील भागाला एक चीर दिला जातो आणि थायरॉईड कार्टिलेजला मागच्या बाजूला ढकललं जातं. ज्यामुळे आवाज भारी होतो. लोकल एनेस्थेशिया दिलं जातं. रुग्ण आपल्या आवाजाचा टोन आणि पिच हवा तसा मिळवू शकतो. सर्जरीनंतर रुग्ण लगेच बोलू शकतो पण तेव्हा त्याचा आवाज थोडा अडकल्यासारखा ऐकू येईल. गळ्याला दिलेलाला चीर एक आठवड्यात बरा होतो. पण पूर्णणपे बरा होण्यास 8 महिन्यांचा कालावधी लागतो. हे वाचा - संतापजनक! डॉक्टरसमोर रुग्णाच्या डोळ्यातून आलं पाणी; क्लिनिकने रडण्याचेही पैसे वसूल केले डॉ. कुर्सत म्हणाले, प्रत्येक व्यक्तीचा आवाज त्याच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतो. जर तो आवाजामुळे आनंदी नसेल तर व्यावसायिक आणि व्यक्तिगत आयुष्यातही त्याला हरल्यासारखं वाटतं. त्यांच्याकडे जास्तीत जास्त असे लोक येतात ज्यांना आपला आवाज आवडत नाही. कंपनीच्या उच्च पदावर असलेले लोक ज्यांचा आवाज बारीक आहे किंवा ट्रान्सजेन्डर ज्यांना आपल्या लिंगानुसार आवाज बदलायचा असतो, असे लोक ही सर्जरी करायला येतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, Health, Lifestyle

    पुढील बातम्या