• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Looking Old Before Age : तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या या तीन सवयी वयापूर्वी वृद्ध दिसण्यास आहेत कारणीभूत

Looking Old Before Age : तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या या तीन सवयी वयापूर्वी वृद्ध दिसण्यास आहेत कारणीभूत

खरं तर या धावपळीच्या जीवनात आपल्याकडे सर्वकाही वेळेवर करण्यासाठी पुरेसा वेळच नसतो. परिस्थितीनुसार आपण आपल्या जेवणाची वेळ, कामाची वेळ, झोपेची वेळ ठरवतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : आजकालच्या जीवनशैलीत अवेळी जेवणं आणि बराच वेळ स्क्रीन समोर बसणं ही बाब अगदी सामान्य झाली आहे. खरं तर या धावपळीच्या जीवनात आपल्याकडे सर्वकाही वेळेवर करण्यासाठी पुरेसा वेळच नसतो. परिस्थितीनुसार आपण आपल्या जेवणाची वेळ, कामाची वेळ, झोपेची वेळ ठरवतो. पण तुम्हाला माहीत आहे का? की तुमचा आहार आणि सवयी वृद्धत्वाच्या प्रक्रियेला गती देऊ शकतात? दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जर तुम्ही चुकीची झोप घेत असाल, आहारात जास्त साखर वापरत असाल आणि दीर्घकाळापर्यंत संगणक, लॅपटॉपवर काम करत असाल तर तुम्ही वयापूर्वी वृद्ध दिसण्याची (Looking Old Before Age) अधिक शक्यता असते. जर एखाद्या व्यक्तीला या तीन दैनंदिन सवयी असतील किंवा यापैकी कोणतीही एक सवय असेल तर ती व्यक्ती वयापूर्वी वृद्ध दिसण्याची अधिक शक्यता असते. यासाठी या अहवालात काही विद्यापीठे आणि संस्थांच्या संशोधनाचा हवालाही दिला आहे. झोपण्याची चुकीची सवय या अहवालात तुम्ही कसे झोपू नये याविषयी सांगण्यात आले आहे. तुमची चुकीची झोपण्याची पद्धत चेहऱ्यावरील सुरकुत्या वाढवू शकते. ज्यामुळं वयापूर्वी तुम्ही वृद्ध दिसू लागता. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, जर तुम्ही झोपताना एका कुशीवर झोपत असाल तर तुमचा चेहरा घासला जातो. चेहरा घासल्यामुळे वयापूर्वी त्यावर सुरकुत्या दिसू लागतात. त्यामुळे झोपताना ही गोष्ट लक्षात ठेवावी. हे वाचा - डॉक्टरच्या एका चुकीमुळे तरुणीचं आयुष्य उद्धवस्त; आधी धक्क्यानं आईचा मृत्यू, मग बॉयफ्रेंडनंही सोडली साथ जास्त साखरेचे सेवन या संशोधनात, असेही सांगण्यात आलंय की, जे लोक आपल्या आहारात साखरेपासून बनवलेल्या गोष्टी जास्त घेतात त्यांना अकाली वृद्धत्वाचा धोका असतो. स्प्रिंगर लिंक या वैद्यकीय नियतकालिकाने केलेल्या संशोधनानुसार, जेव्हा साखरेच्या सेवनानंतर ग्लायकेशनची प्रक्रिया होते, त्या काळात ते पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या धोकादायक मुक्त रॅडिकल्समध्ये बदलते. हे वाचा - Siddharth Shuklaच्या निधनांतर 5 आठवड्यांनी Shehnaz कामावर परतली, सेटवर येताच दिलजीतला दिले फटके; VIDEO VIRAL बराच वेळ संगणकासमोर बसून काम PubMed.gov नुसार, जर तुम्ही आठवड्यातून 4 दिवस 8-8 तासांच्या शिफ्टमध्ये संगणकावर काम करत असाल तर दुपारच्या उन्हात 20 मिनिटे घालवण्यासारखे आहे. पबमेडच्या म्हणण्यानुसार, बराच वेळ संगणकावर बसून राहिल्याने तुमच्या त्वचेला तेवढेच नुकसान होते जितके ते सूर्यापासून करते.
  Published by:News18 Desk
  First published: