मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Lemon Peel: इतके उपयोगी गुण समजल्यावर तुम्ही कधीच फेकणार नाहीत लिंबाची साल

Lemon Peel: इतके उपयोगी गुण समजल्यावर तुम्ही कधीच फेकणार नाहीत लिंबाची साल

लिंबाच्या सालीचा उपयोग

लिंबाच्या सालीचा उपयोग

लिंबाच्या रसात मिनरल्स असल्याने पचनक्रिया चांगली आणि वेगात होते. यामुळे खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचतं. लिंबाच्या सालीत व्हिटॅमीन सी, ए, फॉलेट, पोटॅशियम, कॅल्शियम असतं. त्यामुळे लिंबाची साल वापरल्याने फायदा होतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

नवी दिल्ली, 04 डिसेंबर : कोणत्याही ऋतुमध्ये थंडावा मिळण्यासाठी आपण सगळेजण आवडीने लिंबू सरबत पितो. लिंबू सरबतामुळे आपल्याला ऍन्टीऑक्सीडेंट मिळतात. यातील व्हिटॅमीन सी, ए, पोटॅशियम, कॅल्शियम यामुळे आपल्याला लगेच फ्रेश वाटतं. लिंबामुळे चेहरा तजेलदार बनतो. लिंबाचे अनेक फायदे आपल्याला माहीत असतील.  मात्र, लिंबाच्या सालीचाही उपयोग आपण करू शकतो. लिंबाच्या सालीत व्हिटॅमीन, झिंक, फायबर मोठ्या प्रमाणात असतात. लिंबाच्या सालीत व्हिटॅमीन सी, ए, फॉलेट, पोटॅशियम, कॅल्शियम असतं. त्यामुळे लिंबाची साल वापरल्याने फायदा होतो. लिंबाच्या सालीचे फायदे जाणून घेऊयात.

पचनक्रिया सुधारते - 

लिंबाच्या रसात मिनरल्स असल्याने पचनक्रिया चांगली आणि वेगात होते. यामुळे खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचतं. त्यामुळेच आपला  रोगांपासून बचाव होतो.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर -

लिंबाच्या सालीमध्ये पेक्टिन नावाचं तत्त्व असतं. ज्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होत नाही. वजन कमी करायचं असेल तर, लिंबाची साल वापरावी.

ऑक्सिडेंटिव्ह स्ट्रेस दूर करण्यासाठी

लिंबाच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लेवेनॉईड असतं. त्यामुळे ऑक्सिडिंटव्ह स्ट्रेस कमी करण्यात मदत होते.

कोलेस्ट्रॉल कंट्रोल

शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरतं. लिंबाच्या सालीतील पॉलिफिनॉलमुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊन आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

हार्ट अटॅकची भीती कमी

लिंबाच्या सालीमध्ये पोटॅशियम असतं. ज्यामुळे हार्ट अटॅकची भीती कमी होते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित राहतो. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी लिंबाची साल उपयुक्त ठरते.

त्वचेसाठी फायदेशीर

लिंबाच्या सालीमध्ये ऍन्टीऑक्सीडेंट असतं. त्यामुळे आपली त्वचा डिटॉक्स होते. यामुळेच अवेळी चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या, पिंपल्स, पिग्मींटेन्शन किंवा चेहऱ्यावर येणारे डाग यावर याचा वापर करता येतो.

हे वाचा - हिवाळ्यात कोंडा आणि केसगळतीचा त्रास वाढतो! हे घरगुती उपाय नक्की करून बघा

दात आणि हिरड्यांसाठी

लिंबाच्या सालीमध्ये सायट्रिक ऍसिड भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी कमी झाल्यामुळे होणारं नुकसान टाळायचं असेल तर, लिंबाची साल वापरा. यामुळेच दातांबरोबर हिरड्यासंबंधित आजार देखील कमी होतात.

हे वाचा - तुमच्याही नखांजवळील त्वचा निघते का? जाणून घ्या त्रास कमी करण्याचे घरगुती उपाय

हाडं मजबूत होतात

लिंबाच्या सालीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे आपली हाडं आणि दात मजबूत होतात. याशिवाय हाडांशी संबंधित अनेक आजार ऑस्टिओपोरोसिस आणि पॉलीआर्थरायटिसपासून बचाव होऊ शकतो.

प्रतिकारशक्ती वाढते

लिंबाच्या सालीमुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. त्यात असलेल्या ऍन्टी ऑक्सीडेंटमुळे स्किन कॅन्सरला प्रतिबंध होण्यास मदत होते.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )

First published:

Tags: Health Tips, Lifestyle