नवी दिल्ली, 21 मे : आजच्या काळात युनिसेक्स फॅशनची खूप चर्चा आहे. युनिसेक्स फॅशन म्हणजे पुरुष आणि स्त्रिया दोघेही ते कपडे परिधान करू शकतील असे कपडे. चष्म्यापासून जीन्सपर्यंत बऱ्याच गोष्टी, अनेक प्रकारचे कपडे युनिसेक्समध्ये मिळत आहेत. पूर्वीच्या काळी फक्त पुरुषच शर्ट घालायचे. पण, आजच्या काळात महिलाही शर्ट घालतात. पण या दोन शर्टमध्ये मोठा फरक आहे. पुरुषांच्या शर्टचे बटण उजवीकडे असते, तर महिलांच्या शर्टचे बटण डावीकडे असते. हे एका खास कारणासाठी केले जाते. बटणातील या फरकाची अनेक उत्तरे आहेत. आज आम्ही तुम्हाला त्यापैकी काहींची उत्तरे (Button the left side of the women's shirt) देणार आहोत.
इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर पूर्वीच्या काळी पुरुष उजव्या हातात तलवार धरायचे आणि स्त्रिया डाव्या हाताला मुलांना धरत. अशा परिस्थितीत जेव्हा त्या माणसाला शर्टाची बटणे उघडायची किंवा लावायची गरज पडली तेव्हा तो यासाठी डाव्या हाताचा वापर करत असे. जर डावा हात वापरला जात असेल तर शर्टचे बटण उजवीकडे असावे. याउलट स्त्रिया आपल्या मुलाला डाव्या बाजूला धरत असत. बाळांना दूध पाजण्यासाठी शर्टची बटणे काढताना त्यांना उजव्या हाताचा वापर करावा लागला. यामुळे बटणे डाव्या बाजूला केली गेली.
नेपोलियनशी जोडले आहे कनेक्शन -
असे म्हणतात की, नेपोलियन बोनापार्टने महिलांच्या शर्टची बटणे डावीकडे असावीत असा आदेश दिला होता. कथांनुसार, नेपोलियन नेहमी त्याच्या शर्टमध्ये एक हात ठेवत असे. अनेक स्त्रिया त्याचे अनुकरण करू लागल्या. आपलं असं अनुकरण होऊ नये म्हणून नेपोलियनने स्त्रियांच्या शर्टमध्ये अधिक बटणे लावण्याचे फर्मान काढले. मात्र, याचा कोणताही ठोस पुरावा नाही. पण, काही कथांच्या आधारे लोक हे सत्य मानतात.
घोडेस्वारी हेही कारण -
पूर्वीच्या काळी स्त्रिया दोन्ही पाय एकाच बाजूला टाकून प्रवास करत असत. डावीकडे बटणे लावल्यास वारा त्यांच्या शर्टच्या आत विरुद्ध दिशेने चालण्यास मदत करत असे. याशिवाय काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महिला आणि पुरुषांच्या कपड्यांमध्ये फरक निर्माण करण्यासाठी त्यांच्या शर्टची बटणे वेगवेगळ्या बाजूंनी लावली गेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.