नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : आपल्या देशांमध्ये भात (Rice) हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. भाताला मुख्य अन्नही म्हटलं जाऊ शकतं. कारण त्याच्याबरोबरीने इतर भाज्या (Vegetable) आणि पदार्थ खाल्ले जातात. फार क्वचितच लोक भात, चपाती यांना सोडून इतर पदार्थ जेवणात (Meal) मुख्य पदार्थ म्हणून घेतात. रोजच्या जेवणामध्ये भात खाल्ला जातो. भात खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. भात खाल्ला नाही तर, जेवल्यासारखं वाटत नाही अशी कितीतरी माणसं आपल्या आजूबाजूला असतात मात्र, काही लोकांना भात खाल्ल्यानंतर झोप (Sleep) येते. त्यामुळे इच्छा असूनही बर्याचदा भात खाणं टाळलं जातं. तज्ज्ञांच्यामते (Expert) भात खाल्ल्यानंतर झोप येणं ही एक नैसर्गिक (Natural) गोष्ट आहे. पण, ज्यांना भात खाल्ल्यानंतरही झोप येऊ नये असं वाटतं. त्यांनी भात थोड्या प्रमाणात म्हणजेच शॉर्ट मील (Short Meal) म्हणून खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र भात खाल्ल्यावर झोप का येते हा खरा प्रश्न आहे. जाणून घेऊयात या प्रश्नाचे उत्तर.भात खाल्ल्यावर झोप येते
तज्ज्ञांच्यामते भातच नाही तर, कार्बोहायड्रेट असणाऱ्या सगळ्याच पदार्थांमुळे थोड्याफार प्रमाणामध्ये सुस्ती येते आणि झोप आल्यासारखं वाटतं. तांदूळ, गहू यासारख्या कार्बोहायड्रेट असणाऱ्या पदार्थांमध्ये स्टार्च असतं. पोटामध्ये अन्न पचवताना स्टार्च कमी होऊन ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये तयार होतं. ग्लुकोज इन्सुलिन हार्मोनला निर्माण करण्यास ऍक्टिव्ह करतं.
(या’ उपायांनी मिनिटात पाली घर सोडून पळून जातील; संपेल कायमचा त्रास)
ज्यामुळे Tryptophan प्रॉडक्शन व्हायला लागतं आणि यामुळे Serotonin आणि Melatonin सारखे हार्मोन्स तयार व्हायला लागतात आणि Melatonin हॅपी हार्मोन्स आहे ज्यामुळे झोप यायला लागते.
भात खाल्ल्यामुळे झोप येत असेल तर, जेवणामध्ये खूप जास्त भात खाण्यापेक्षा त्याचं प्रमाण कमी करावं. आपण जेवढ्या प्रमाणामध्ये भात खातो. तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट जात असतात. कार्बोहाइड्रेट वाढल्यामुळे शरीरात स्लिप हार्मोन्स देखील रिलीज व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे सुस्ती येते.
(पर्यटनाची भुरळ घालणाऱ्या लोन स्किम स्वीकारण्याआधी नियम वाचा; नाहीतर पस्तवाल!)
आपल्या आहारामध्ये 50 % भाज्या, 25 % प्रोटीन आणि 25 % कार्बोहाइड्रेट असायला हवेत. कार्बोहायड्रेट प्रमाणेच प्रोटीनमुळे देखील आहारात कमीच असावेत. त्यामुळे Tryptophanची लेव्हल वाढते.
(हे 5 घटक असतील रोजच्या आहारात तर, म्हातारपणात देखील केस गळणार नाहीत)
झोप येते म्हणून भात खाणं बंद करू नये. भातामध्ये कार्बोहायड्रेट असले तरी कार्बोहायड्रेटे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. त्यामुळे भात कमी प्रमाणात खावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle