Home /News /lifestyle /

तुम्ही टॉयलेटमधून आल्यानंतर लगेच पाणी पिता का? हेल्थवर होऊ शकतो उलटा परिणाम

तुम्ही टॉयलेटमधून आल्यानंतर लगेच पाणी पिता का? हेल्थवर होऊ शकतो उलटा परिणाम

तुम्ही किती पाणी पिता हेही महत्त्वाचं आहे. यामुळं लघवीला जाऊन आल्यानंतर सुमारे 10 ते 15 मिनिटं पाणी पिऊ नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

    नवी दिल्ली, 18 डिसेंबर : अनेकांना लघवीला जाऊन आल्यानंतर लगेच पाणी (Water) पिण्याची सवय असते. तुम्हीही रोज असेच करत असाल तर, ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. तज्ज्ञांच्या मते, ही सवय तुमच्यासाठी धोकादायक आहे. असं झी न्यूजच्या बातमीत म्हटलं आहे. गंभीर समस्यांचा धोका 'झी न्यूज'ने दिलेल्या बातमीनुसार लघवी केल्यानंतर (Urination) लगेच पाणी प्यायल्यास मूत्रपिंडाशी (Kidney) संबंधित काही गंभीर समस्यांचा धोका असतो. जर तुम्ही अधूनमधून असं करत असाल तर त्यामुळं तुम्हाला कोणतीही समस्या उद्भवत नाही. परंतु जेव्हा तुम्ही दररोज असं करता, तेव्हा मूत्रपिंडाशी संबंधित समस्या (Kidney Disease) उद्भवू शकतात. मुतखडा (kidney stone) जेव्हा तुम्ही लघवी करता तेव्हा तुमचं मूत्राशय रिकामं होतं. अशा स्थितीत लगेच पाणी प्यायल्यानं मुतखड्याचा धोका वाढतो. हे वाचा - Healthy Breakfast: सकाळी नाश्त्यामध्ये या गोष्टी खाणं आहे फायदेशीर; अनेक आजार राहतील दूर या बाबींची घ्या काळजी तुम्हाला जरी लघवीला जाऊन आल्यानंतर लगेच पाणी प्यावंसं वाटत असेल, तरी अशा वेळेस काही बाबींची काळजी घ्या. लघवी केल्यानंतर लगेच थोडेसं पाणी पिणं धोकादायक नाही. परंतु, त्या वेळेस जास्त पाणी दररोज पिऊ नका. यामुळं लघवीमध्ये जंतुसंसर्ग (युरिन इन्फेक्शन - urine infection) होण्याचाही धोका असतो. तुम्ही किती पाणी पिता हेही महत्त्वाचं आहे. यामुळं लघवीला जाऊन आल्यानंतर सुमारे 10 ते 15 मिनिटं पाणी पिऊ नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. हे वाचा - Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी चुकूनही या गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका, या आजारांचा धोका (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या