Ex ला विसरण्याच्या नादात तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Ex ला विसरण्याच्या नादात तुम्ही या चुका तर करत नाही ना?

अनेकदा या प्रयत्नांमध्ये ते चुकीच्या माणसाला डेट करू लागतात. जर तुम्हीही अशी चूक करत असाल तर वेळीच सावध व्हा.

  • Share this:

प्रेमाचं नातं जेव्हा तुटतं तेव्हा त्यासोबत अनेक स्वप्न आणि भावनाही मरतात. हे दुःख अनेकदा एवढं जास्त असतं की या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी अनेकांना डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. ब्रेकअपनंतरचा प्रत्येक दिवस हा मरण यातनेपेक्षा कमी नसतो. नैराश्यात जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण या सगळ्यात अशीही काहीजण असतात की ते काळोखात रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा या प्रयत्नांमध्ये ते चुकीच्या माणसाला डेट करू लागतात. जर तुम्हीही अशी चूक करत असाल तर वेळीच सावध व्हा. अशा परिस्थितीतून कसं निघायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ब्रेकअपनंतर अनेकदा लोक अशा व्यक्तिच्या शोधात असतात ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ते रडू शकतील. अशा परिस्थितीत कोणी आपली जराशी काळजी घेतली तरी दुखलेलं मन त्याच्या मागे धावू लागतं आणि त्या व्यक्तिकडे अधिक आकर्षित होतं. काही काळासाठी हा फार सुखद अनुभव वाटतो. मात्र पुढे जाऊन जेव्हा याचं नात्यात रुपांतर करण्याची इच्छा मनात येतात तेव्हा हे प्रेम नसल्याचं हळूहळू कळायला लागतं.

ब्रेकअपनंतर अनेक लोक नवीन भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमध्ये एक्स पार्टनरची प्रतिमा पाहतात. या परिस्थितीत चुकून तशीच एखादी व्यक्ती भेटली तर त्या व्यक्तिशी तुम्ही भावनात्मक जोडले जातात. अशावेळी तुम्हालाच हे समजून घेतलं पाहिजे की, तुमच्या एक्स पार्टनरहून ती व्यक्ती पूर्णपणे वेगळी असून तिच्या मनात तुमच्यासाठी तशाच भावना असतील हे काही गरजेचं नाही.

आपल्या आयुष्यात अशा अनेक व्यक्ती येतात ज्यांना आपण आवडत असतो आणि ते त्यांचं प्रेम व्यक्तही करतात. अशा व्यक्तींना अनेकदा फ्रेण्डझोन केलं जातं. मात्र ब्रेकअपनंतर स्वतःला सांभाळण्यासाठी त्या लोकांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करतो. ही स्थिती तुमच्यासाठी धोकादायक आहे. हे नेहमी लक्षात ठेवा की, तुम्हालाच तुमची मदत करायची आहे. स्वतःहून मोठं काहीच नाही. जे तुमचं आहे ते तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.

आता प्रेमाला म्हणा नकोच, कारण त्याचाही आहे अनोखा फायदा!

हॉट योगा करून या आजारापासून होऊ शकता मुक्त

या रामबाण उपायांनी मिळवा मायग्रेनपासून सुटका!

हे चार ड्रायफ्रूट्स तुम्हाला अनेक आजारांपासून ठेवतं दूर!

VIDEO: मुंबईत असल्फा इथे घराची भिंत कोसळली

Published by: Madhura Nerurkar
First published: September 8, 2019, 7:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading