सध्याच्या मॉर्डन लाइफ स्टाइलमध्ये रिलेशनशिप हा एक ट्रेंड बनला आहे. प्रेम हे माणसाची आवड आणि गरज दोन्ही बनलं आहे. पण जर हेच प्रेम तुमच्या गळ्याभोवतालचा फास बनला तर? प्रेमाच्या नात्यात आपल्या जोडीदारावर हक्क गाजवणं तसंच पार्टनरसाठी त्याग करणं या गोष्टी ओघानं केल्या जातातच. पण हे तेव्हाच घडतं ज्यावेळी ती व्यक्ती स्वतःहून त्या गोष्टीसाठी तयार असते. अन्यथा जबरदस्तीनं तुम्ही एखाद्याचं प्रेम किंवा विश्वास जिंकू शकत नाही. कारण प्रत्येकाला त्याची स्पेस महत्त्वाची असते आणि हे समजून घेणं प्रत्येक नात्यासाठी अतिशय गरजेचं असतं. पण जर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या पर्सनल स्पेसमध्ये दखल देत असाल किंवा त्याच्या गैरहजेरीत त्याचा मोबाइल तपासत असाल, त्याचा पासवर्ड घेऊन सर्व माहिती तपासत असाल तर मग ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ज्यामुळे तुमचं नातं कायमचं संपू शकतं.
(वाचा:भेंडी खाल्ल्याने कमी होतं वजन; जाणून घ्या आणखी फायदे)
कोणत्याही व्यक्तीच्या खासगी जीवनात प्रमाणापेक्षा जास्त दखल देणं किंवा त्या व्यक्तीचा फोन त्याच्या नकळत तपासणं चुकीचं मानलं जातं. जेव्हा नात्यातील स्पेस संपते, त्यावेळी प्रेमसुद्धा संपतं. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्यातील अति हस्तक्षेप नेहमीच घातक ठरू शकतं. जर हीच गोष्ट तुमच्या जोडीदारानं तुमच्यासोबत केली तर तुम्हाला कसं वाटेल. त्यामुळे ही गोष्ट तुमच्या नात्यासाठी घतक ठरते.
(वाचा :'हा' आहे जगातला शेवटचा महामार्ग; या मार्गावर एकट्याने फिरण्यास आहे बंदी)
जोडीदाराच्या गैरहजेरीत किंवा त्याच्या समोर त्याचा फोन तपासणं हे दाखवतं की तुमच्या नात्यात विश्वास नाही. प्रेमात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. जर तो कमी होत असेल तर ते नातं फार काळ टिकू शकत नाही. जर तुमचा जोडीदार त्याचा पासवर्ड स्वतःहून तुमच्याशी शेअर करत असेल तरीही त्याच्या परवानगीशिवाय त्याचा मोबाइल किंवा सोशल मीडिया तपासून त्याच्या विश्वासाचा फायदा घेऊ नका.
(वाचा :पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी बेस्ट आहेत 'ही' 5 डेस्टिनेशन्स)
तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर जात आहे. तर लपून त्याचा फोन चेक करण्यापेक्षा एकदा त्याच्याशी शांतपणे बोला. लक्षात ठेवा नात्याचं ओझं झालं तर तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघांच्याही आयुष्यात समस्या येतील. त्यामुळे नात्यातील गुंता प्रेमानं सोडवा. पण त्यानंतरही तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर होऊ इच्छित असेल तर त्याला तसंच जाऊ द्या जसं तुम्ही एखाद्या पक्ष्याला पिंजऱ्यातून बाहेर जाऊ दिलं आहे. यामुळे काही काळासाठी तुम्हाला त्रास होईल पण नंतर काही काळानं तुम्हालाही शांत आणि समाधानीही वाटेल.
============================================================
EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?