• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • तुम्ही झोपेत तोंडाने श्वास घेता? मग 'हे' नक्की वाचा...

तुम्ही झोपेत तोंडाने श्वास घेता? मग 'हे' नक्की वाचा...

सर्दी झाल्यावर वाफ घेण्यासारख्या घरगुती उपायांद्वारेही श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होते.

सर्दी झाल्यावर वाफ घेण्यासारख्या घरगुती उपायांद्वारेही श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होते.

सर्दी झाल्यावर वाफ घेण्यासारख्या घरगुती उपायांद्वारेही श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होते.

 • Share this:
  मुंबई, 15 सप्टेंबर : आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवण्याचं (Oxygen) आणि कार्बन डायॉक्साइड (Carbon Dioxide) बाहेर काढून टाकण्याचं काम श्वासोच्छ्वासाद्वारे (Nasal Breathing) केलं जातं. हे काम नाकाद्वारे केलं जातं, हेही आपण जाणतो. तोंडाने श्वास घेणंही शक्य असतं. किंबहुना नाकाद्वारे श्वास घेण्यात काही अडचण असेल, सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, तर अशा वेळी आपोआपच तोंडाने श्वास घेतला जातो. त्या वेळी ते आवश्यकच असतं; मात्र अनेक जण झोपेत असताना नाकाऐवजी तोंडाने (Mouth Breathing) श्वास घेतात. ते शरीरासाठी हानिकारक असतं. म्हणूनच नाकाने श्वास घेण्यामागचं शास्त्र जाणून घेणं आवश्यक आहे. नाकाचा मार्ग सर्दीमुळे (Cough) किंवा कफमुळे बंद झाला, तर तोंडावाटे श्वास घेतला जाणं, ही शरीराची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. अशा स्थितीत नेझल ब्रीदिंग अर्थात नाकाने श्वास घेण्याच्या स्थितीत सुधारणा होण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. दर्जेदार व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स, तसंच व्हिटॅमिन सी (Vitamin C Suppliments) मिळेल अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा. पुण्यात अल्पवयीन पोरं करताय हफ्ता वसुली, दुकानदारावर कोयत्याने हल्ला, LIVE VIDEO आवळा हा व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत आहे. हळदीमध्ये असलेल्या कुरकुमिन या घटकामुळे सायनस ब्लॉकेजेस सुटण्यासाठी मदत होते. झिंक या खनिजाची उपलब्धता असलेले खाद्यपदार्थ आणि सप्लिमेंट्सचाही आहारात समावेश असावा. आहारतज्ज्ञ किंवा पोषणतज्ज्ञाशी संपर्क साधून डाएट आणि सप्लिमेंट्सचं आहारातलं प्रमाण ठरवता येऊ शकतं. 'झी न्यूज'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे. KBC 13: आकाशच्या कहाणीतून उलगडलं कोरोना काळातलं पुण्याच्या सोसायटीचं भीषण वास्तव तोंडाने नव्हे, तर नाकाने श्वास घेणं शरीराला फायदेशीर असतं, म्हणूनच शरीराची रचना तशी आहे. नाकाने आपण ऑक्सिजन घेऊन कार्बन डायॉक्साइड सोडतो. हे आरोग्यासाठी चांगलं असतंच; पण वेट लॉस (Weight Loss) अर्थात वजन घटवण्यासाठीही महत्त्वाची भूमिका निभावतं. लालबहादूर शास्त्रींची सुवर्णतुला : 27 कोटीचं सोनं 56 वर्षांपासून पडलंय अडकून तज्ज्ञ असं म्हणतात की, झोपेच्या कालावधीत आपलं शरीर सर्वांत जास्त रिकव्हरीचं काम करते. म्हणजे शरीरात काही बिघाड झाले असतील, तर ते दुरुस्त करण्याचं काम झोपेच्या कालावधीत केलं जातं. वेट लॉसचाही त्यात समावेश असतो. म्हणूनच अशा वेळी शरीराला योग्य पद्धतीने ऑक्सिजनचा पुरवठा होणं गरजेचं असतं. नाकाद्वारे श्वास घेतल्याने शरीराच्या मज्जासंस्थेला आराम मिळतो. म्हणूनच नाकानेच श्वासोच्छ्वास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं तज्ज्ञ म्हणतात. सर्दी झाल्यावर वाफ घेण्यासारख्या घरगुती उपायांद्वारेही श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होते. श्वसनमार्ग मोकळा झाल्यावर साहजिकच नाकाने श्वास घेण्यात काहीही अडचण येत नाही.
  First published: