नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : हल्ली महिलांना त्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी लिपस्टिक (Lipstick ) लावणं आवडतं. महिला वेगवेगळ्या स्टाइलची लिपस्टिक वापरतात. त्याचबरोबर अनेकदा असंही दिसून येतं की, महिलांनी कोणताही मेकअप केला नसला तरी त्या लिपस्टिक नक्कीच लावतात. लिपस्टिकनं येणारा स्टायलिश लुक सर्वांनाच आवडतो. शिवाय, ज्या महिला आपल्या लुकबाबत जागरूक असतात, त्या मेकअपमध्ये नवनवीन (Lipstick Is Harmful For Health) प्रयोग करतात.
हे मेकअप प्रोडक्टस् तुमचं सौंदर्य वाढवत असली तरी त्यासोबतच काही खबरदारी घेणंदेखील आवश्यक आहे. यातील लिपस्टिक (Lipstick ) तुमच्या ओठांच्या सौंदर्यात जितकी भर घालते, तितकीच ती तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. लिपस्टिकच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ओठांवर रसायनांचा थर लावत असता. सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक लिपस्टिकमध्ये वापरलेली रसायनं तुमच्या आरोग्याशी खेळू शकतात. तुम्हाला लिपस्टिक लावण्याचा शौक असेल तर, नेहमी चांगल्या ब्रँडची तपासणी केल्यानंतरच लिपस्टिक खरेदी करा. यामुळं कधीही स्वस्त लिपस्टिक खरेदी करू नका किंवा वापरू नका. आज आम्ही तुम्हाला लिपस्टिकचा तुमच्या आरोग्याला कसा धोका होऊ शकतो, हे सांगणार आहोत.
लिपस्टिकचे तोटे
लिपस्टिक लावल्यानंतर जेव्हा आपण काही अन्नपदार्थ खातो तेव्हा, त्यासोबत लिपस्टिकमध्ये असलेली रसायनंही आपल्या शरीरात जातात. लिपस्टिकमध्ये असलेली ही रसायने शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकतात.
हे वाचा - नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला तर काय करायचं? सरकारची यंत्रणा लागली कामाला!
तुम्ही लिपस्टिकचा जास्त वापर करत असाल, तर जाणून घ्या की, त्यामध्ये शिसं, अॅल्युमिनियम, कॅडमियम, क्रोमियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण तुमच्या शरीरात आहे, ज्याचा मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
लिपस्टिकमध्ये असलेलं अॅल्युमिनियम आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकतं. अशी लिपस्टिक पोटात गेल्यास अल्सर होऊ शकतो.
लिपस्टिकमध्ये असलेले घटक तुमच्या शरीरातील फॉस्फेट कमी करू शकतात.
हे वाचा - पत्नीच्या मदतीने हनी ट्रॅपमध्ये अडकवलं, कोल्हापुरातील व्यावसायिकाला लाखोंचा गंडा
यासोबतच शिसं लिपस्टिकच्या अतिवापरामुळे महिलांची शैक्षणिक क्षमता, स्मरणशक्ती आणि बुद्ध्यांक पातळी कमी करू शकतं.
लिपस्टिकमध्ये असलेले घटक शरीरात गेल्यानं चिडचिड वाढू शकते.
लिपस्टिकमधील क्रोमियममुळं कर्करोगाचा धोका वाढू शकतो
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips