फिरायला जाण्याआधी 'असं' प्लॅन करा बजेट; 20 टक्के कमी होईल तुमचा खर्च

फिरायला जाण्याआधी 'असं' प्लॅन करा बजेट; 20 टक्के कमी होईल तुमचा खर्च

या टिप्स जर तुम्ही फॉ़लो केल्या, तर लुटता येईल तुम्हाला कमी पैशात फिरण्याचा आनंद

  • Share this:

मुंबई, 10 जून : कुठेही फिरायला जाताना सगळ्यात आधी विचार केला जातो तो वेळेचा आणि बजेटचा. कमीत कमी वेळेत ट्रिप एन्जॉय करता यावी म्हणून या दोन गोष्टींची सांगड घालणं अत्यंत गरजेचं असतं. आज आम्ही तुम्हाला ट्रिप प्लॅन करताना आपलं बजेट कसं प्लॅन करायचं हे सांगणार आहोत. या टिप्स जर तुम्ही फॉ़लो केल्या, तर टूरसाठी प्लॅन केलेल्या बजेटच्या 20 टेक्के खर्च तुम्ही कमी करू शकाल.

सदस्य आणि बजेट - ट्रिप प्लॅन करताना लहान आणि मोठे मिळून तुम्ही एकून किती सदस्य फिरायला जाणार आहात यावर आधी फोकस करा. त्यानंतर बजेटमध्ये बसेल असं डेस्टिनेशन तुम्ही निवडा. फिरायला जाण्याचं ठिकाण एकदा ठरलं की, तेथे जाण्यासाठी तुम्ही बजेट प्लॅन करा. हे प्लॅनिंग करताना त्यात एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशनपासून ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी साधारण किती टॅक्सी भाडं लागू शकतं अशा लहान-सहान खर्चाचासुद्धा समावेश करा.

Cycling चा मनमुराद आनंद देणारी ही आहेत 5 top destinations

असं बुक करा फ्लाइटचं तिकीट - डेस्टिनेश फिक्स झाल्यानंतर जर तुम्ही विमानाचं तिकीट बुक करत असाल तर वीकेंड तिकीट बुक करण्याचं प्रकर्षाने टाळा. वीकेंड वगळता इतर कोणत्याही दिवशीचं तिकीट बुक केल्याने प्रवास भाडं कमी लागतं. हा अनेकांचा अनुभव असल्यामुळे तिकीट बुक करताना विकेंडवर लक्ष ठेवा.

हॉटेलचं प्री-बुकिंग - कुठेही बाहेर गेल्यानंतर राहण्या-खाण्यावरच जास्त खर्च होतो. त्यामुळे ट्रिप प्लॅन करताना ज्या डेस्टिनेशनला तुम्ही जात आहात तिथलं एखादं चांगलं हॉटेल निवडून राहण्यासाठीचं प्री-बुकिंग करून ठेवा. यासाठी वेगवेगळे अॅप्सवर तुम्हाला बेस्ट हॉटेल डील्स चेक करता येतील.

क्रेडीट कार्डचे बोनस पॉइंट - फिरायला जाण्याआधी बजेट फिक्स करताना क्रेडीट कार्डच्या बोनस पॉइंट्सवरसुद्धा तुम्ही लक्ष ठेवा. अशा अनेक क्रेडीट कार्ड कंपन्या आहेत ज्या विविध ऑफर्स जाहीर करतात, त्या ऑफर्स समजून घेतल्यास तुमची 10 टक्के बचत होऊ शकते.

Western Railway चा नवा उपक्रम : ट्रेनमध्ये फक्त 100 रुपयात मसाज करून मिळणार

क्रेडीट कार्ड पॉइंट्स - जर तुम्ही क्रेडीट कार्ड वापरत असाल आणि त्याचे पॉइंट्स कॅश नसतील केले, तर त्या पॉइंट्सचा तुम्हाला तिकीट बुक करण्यासाठी किंवा हॉटेल बुक करण्यासाठी फायदा होऊ शकतो. विमानाचं तिकीट बुक करताना तुम्हाला हमखास सूट मिळू शकते.

खाण्याचा खर्च होऊ शकतो कमी - बहुतांश डेस्टीनेशन्सला 4 ते 8 दिवस राहण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा असलेली ठिकाणं असतात. विविध माध्यमातून या गोष्टींचा आधी तुम्हाला शोध घ्यावा लागेल. अशा ठिकाणी तुम्ही चहा, नाश्ता आणि स्नॅक्स तयार करू शकता. आशा ठिकाणी जर तुम्ही थांबलात तर तुमचा खाण्याचा खर्च जरा कमी होऊ शकतो.

First published: June 13, 2019, 11:00 AM IST
Tags: lifestyle

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading