Home /News /lifestyle /

झोप झाल्यानंतरही जात नाही आळस? ही दोन योगासने करून घालवा सुस्ती!

झोप झाल्यानंतरही जात नाही आळस? ही दोन योगासने करून घालवा सुस्ती!

हिवाळ्यात (Winter) सगळ्यात जास्त कंटाळा येतो तो सकाळी (morning) लवकर उठण्याचा. सकाळी उठल्यावर अनेकदा झोप (sleep) पुरेशी झालेली वाटत नाही आणि आणखी झोपावंसं वाटतं. दोन योगासने (Yogasanas) तुमच्या या समस्येवर मात करू शकतात.

मुंबई, 15 जानेवारी : हिवाळ्यात (Winter) सगळ्यात जास्त कंटाळा येतो तो सकाळी (morning) लवकर उठण्याचा. सकाळी उठल्यावर अनेकदा झोप (sleep) पुरेशी झालेली वाटत नाही आणि आणखी झोपावंसं वाटतं. आपल्याला आळस (Laziness) येतो आणि त्याचा संपूर्ण दिनक्रमावर परिणाम होतो. कामामध्ये मन लागत नाही; पण आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा आळस जाईल. सकाळची झोप सर्वांनाच आवडते. हिवाळा असेल तर पांघरूण लवकर सोडावंसं वाटत नाही. आपण कसे तरी उठलो तरीही आळस संपूर्ण शरीरावर वर्चस्व गाजवतो. अशा स्थितीत कोणतंही काम करावंसं वाटत नाही. काही प्रमाणात काम केलं, तरी ते मनाप्रमाणे होत नाही. असं वाटतं, की पुन्हा झोपावं. तुम्हीही रोज सकाळी उठण्याच्या धडपडीत असाच तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवत असाल, तर दोन योगासने (Yogasanas) तुमच्या या समस्येवर मात करू शकतात. सकाळी उठल्यानंतर बेडवर बसून ही दोन योगासने करा, यामुळे तुमचा आळसही दूर होईल आणि तुमच्या शरीरात चपळता वाढेल. मंडूकासन मंडूकासनाला फ्रॉग पोझ (Frog Pose) असंही म्हणतात. कारण यामध्ये व्यक्तीची मुद्रा बेडकासारखी होते. हे आसन केल्याने तुमचा आळस तर दूर होतोच; पण मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे आसन खूप फायदेशीर आहे. हे आसन करताना प्रथम वज्रासनामध्ये बसा आणि हाताच्या मुठी अशा प्रकारे घट्ट करा, की अंगठे बाहेरच्या बाजूस राहतील. आता दोन्ही मुठी नाभीच्या दिशेने आणा आणि मुठीने नाभी अशा प्रकारे दाबा, की तुमच्या अंगठ्याचा स्पर्श नाभीला होईल. आता श्वास सोडताना पोट आतल्या बाजूला खेचा आणि पुढे वाका. त्यानंतर तुमची छाती तुमच्या मांड्यांना टेकवा. यानंतर, मान आणि डोकं वर करून समोरच्या दिशेने पाहा. या स्थितीत हळूहळू श्वास घ्या आणि श्वास सोडा. क्षमतेनुसार या स्थितीत राहा आणि थकल्यावर सामान्य स्थितीत या. शशांकासन शशांकासनात माणसाला सशासारखी पोझ घ्यावी लागते. ससा अतिशय चपळ असतो. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासनात बसून दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर सरळ ठेवा. आता श्वास आत घ्या आणि दोन्ही हात वर करा. मान आणि पाठीचा कणा पूर्णपणे सरळ ठेवा. यानंतर, श्वास सोडताना, हळूहळू खाली वाकून आपले दोन्ही हात खाली आणा. आपलं नाक आणि कपाळ जमिनीला लावा आणि दोन्ही हात जमिनीवर सरळ ठेवा. यानंतर, एक श्वास घ्या आणि पुन्हा उठा. चार ते पाच वेळा ही कृती करा. आरोग्याच्या दृष्टीने योगासनं करणं खूप फायदेशीर आहे. झोपेतून उठल्यानंतर आलेला आळस घालवण्यासाठी मंडूकासन व शशांकासन ही योगासनं उपयोगी ठरतात.
First published:

Tags: Winter

पुढील बातम्या