Home /News /lifestyle /

पैशांची सततची चणचण, घरात वाद होणार नाहीत; पोळीशी संबंधित हे उपाय येतील कामी

पैशांची सततची चणचण, घरात वाद होणार नाहीत; पोळीशी संबंधित हे उपाय येतील कामी

कावळ्यांना पोळी खायला घातल्याने कालसर्प आणि पितृदोष दूर होतात. याशिवाय भुकेल्या भिकाऱ्याला भाकरी खाऊ घातल्याने आर्थिक विवंचना दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळते. पोळीशी संबंधित सर्व उपाय जाणून घेऊया.

    मुंबई, 08 जून : प्रत्येक माणसाची इच्छा असते की, त्याला दोन वेळची भाकरी आरामात मिळावी आणि तो आपल्या कुटुंबाच्या गरजा तसेच त्यांची इच्छा पूर्ण करू शकेल. यासाठी तो खूप मेहनत घेतो. असे असूनही अनेक वेळा माणसाला मेहनतीचे फळ मिळत नाही. ज्योतिष शास्त्रामध्ये मनुष्याच्या जवळजवळ प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यांचा अवलंब केल्याने व्यक्तीला अनेक समस्यांपासून बऱ्याच अंशी सुटका मिळू शकते. आपल्या सर्वांची भूक भागवणाऱ्या पोळीचा उल्लेख ज्योतिषशास्त्रातही केला आहे. भोपाळचे पंडित हितेंद्र कुमार शर्मा पोळी किंवा भाकरीशी संबंधित उपाय सांगितले (Roti Upay) आहेत. आर्थिक संकट आणि काल सर्प दोषावर उपाय - असं म्हणतात पहिल्या पोळीवर तूप टाकून त्याचे चार तुकडे करावेत. या चार तुकड्यांवर साखर, गूळ किंवा खीर टाकून एक तुकडा गायीला, दुसरा कुत्र्याला, तिसरा भिकाऱ्याला आणि चौथा तुकडा कावळ्याला खायला द्या. मान्यतेनुसार गाईला पोळी खाऊ घातल्यास पितृदोष दूर होतो. कुत्र्याला पोळी खायला दिल्याने शत्रूची भीती राहत नाही. कावळ्यांना पोळी खायला घातल्याने कालसर्प आणि पितृदोष दूर होतात. याशिवाय भुकेल्या भिकाऱ्याला भाकरी खाऊ घातल्याने आर्थिक विवंचना दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळते. मुंग्यांना पोळी खायला द्या - कितीही प्रयत्न करून आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होत नसतील, तर पोळीचे छोटे तुकडे करून त्यात साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घाला. या उपायाने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि तुमचे कार्य सफल होईल. हे वाचा - ही फळं 5 फ्रिजमध्ये ठेवायची चूक इथून पुढं तरी करू नका; पोषक घटक कमी होतात नोकरीत येणारे अडथळे दूर होतील - ज्या भांड्यात पोळ्या ठेवल्या आहेत, त्या भांड्यात तळापासून तिसरी रोटी काढा, तर्जनी आणि मधले बोट तेलात बुडवून या रोटीवर सरळ रेषा काढा. या पोळीचे दोन भाग करून कुत्र्याला दोन खायला द्या. हा उपाय करताना लक्षात ठेवा, कोणाला काही बोलू नका. हा उपाय गुरुवारी किंवा रविवारी करणे चांगले मानले जाते. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला यश मिळत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकतो. हे वाचा - Monkeypox चं संक्रमण वेगानं, 'या' देशातल्या आकड्यानं वाढवली जगाची चिंता घरातील संकटे दूर होतील - जर तुमच्या घरात नेहमी तणावाचे किंवा त्रासाचे वातावरण असेल तर तुम्ही सकाळी जेव्हा पोळी बनवता तेव्हा पहिली पोळी गाईसाठी आणि शेवटची पोळी कुत्र्यासाठी बनवा आणि त्यांना खायला द्या. शक्य असल्यास स्वतःचे अन्न खाण्यापूर्वी, ही पोळी गाय आणि कुत्र्याला खायला द्या, शक्य नसेल तर तुम्ही नंतरही देऊ शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Personal life

    पुढील बातम्या