Home /News /lifestyle /

क्या बात है! आता केसगळतीचं टेन्शन विसरा; 'हा' घरगुती उपाय ठरेल केसांसाठी वरदान

क्या बात है! आता केसगळतीचं टेन्शन विसरा; 'हा' घरगुती उपाय ठरेल केसांसाठी वरदान

अनेक जण घरच्या घरी उपाययोजना करण्यास प्राधान्य देतात. यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आयुर्वेदिक उपचारही घेऊ शकतो.

  नवी दिल्ली, 21 एप्रिल : आजच्या धावपळीच्या काळात केसांची निगा राखणं कठीण होत चाललं आहे. केसांच्या समस्येनं सध्या जवळपास प्रत्येक जण त्रस्त आहे. केस गळणं, केस अकाली पांढरं होणं, कोंडा होणं या समस्या आता सर्वसामान्य झाल्या आहेत. असं होण्यामागे बदललेलं राहणीमान, खाण्या-पिण्याच्या सवयी, क्षारयुक्त पाणी अशी अनेक कारणं असू शकतात. या समस्येवर आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो, याची माहिती घेऊ या. याबद्दलची माहिती देणारं वृत्त 'झी न्यूज'ने प्रसिद्ध केलं आहे. मानसिक त्रास, अपुरी झोप, पाण्याची कमतरता, शाम्पू आणि तेलामध्ये सतत होणारे बदल, प्रदूषण या कारणांमुळे केसगळती, कोंडा आणि केसांचे इतर त्रास सुरू होतात. केसांच्या विविध समस्यांवर बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु या अनैसर्गिक पर्यायांमुळे विपरीत परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. हे पर्याय परवडणारे नसतात. त्यामुळे अनेक जण घरच्या घरी उपाययोजना करण्यास प्राधान्य देतात. यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आयुर्वेदिक उपचारही घेऊ शकतो. अस्वस्थता वाढली आहे, नैराश्य आलंय? हे उपाय करून पाहा!
   केसांची चांगली वाढ व्हावी, तसंच कोंडा होऊ नये यासाठी अनेक महिला वेगवेगळे घरगुती उपाय करून पाहतात. मेंदी लावणं, चहाच्या पातीचं पाणी वापरणं, अंड्याचा बलक वापरणं, कांद्याचा रस, मध, बदामाचं तेल आदी लावणं अशा उपायांचा त्यात समावेश आहे. अनेक जण लिंबाच्या रसाचा वापर करण्याचा सल्ला देतात. या उपायांपैकी चहाच्या पातीचं पाणी वापरण्याचा उपाय खूपच फायदेशीर ठरू शकतो. चहापातीच्या पाण्यामुळे केसांना चमक येते. परंतु केसगळतीच्या समस्येचं निराकरण होऊ शकतं का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
  केसांना चमक आणण्यासाठी दररोज आपले केस चहापातीच्या पाण्यानं धुवा. या उपायामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. केसांना मॉइश्चराइज्ड ठेवण्यासाठीसुद्धा चहापातीचं पाणी परिणामकारक ठरू शकतं. केसगळतीची समस्या कमी करण्यासह केस निरोगी ठेवण्यासही चहापातीच्या पाण्याचा फायदा होतो. चहापातीच्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. यामुळे केसांमधल्या कोंड्याची समस्याही दूर होऊ शकते. त्याशिवाय चहापातीच्या पाण्यामुळे केस नैसर्गिकरीत्या काळे होऊ शकतात, हे अनेक जणांना ठाऊक नसेल. आपले केस नैसर्गिकरित्या काळे राहावेत असं वाटत असेल, तर चहापातीच्या पाण्याचा वापर जरूरकरून पाहा. हिंगाचे आहेत अनेक आरोग्य फायदे; प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ चरकसंहितेत खास उल्लेख हवेतल्या प्रदूषणामुळे केसांवर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे दररोज केसांची योग्य ती काळजी घ्या. ओले केस विंचरू नका. जेल, कलर, ब्लिच अशा केमिकलयुक्त घटकांमुळे केसांना हानी पोहोचते, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे केस नैसर्गिकरीत्या काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक उपाय करून पाहण्यास हरकत नाही.
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Woman hair

  पुढील बातम्या