सावधान! ऑनलाइन मैत्री करताय या 7 गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

सावधान! ऑनलाइन मैत्री करताय या 7 गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

एकटेपणाला कंटाळून आजकालची तरूणपिढी कोणासमोरही मनमोकळं करायला तयार असते. त्यांना फक्त त्यांचं म्हणणं ऐकणारं कोणी हवं असतं.

  • Share this:

बदलत्या काळासोबत लोकांच्या मैत्रीच्या व्याख्याही बदलत आहेत. सध्या जुन्या मैत्रीला मागे सारत अनेकजण नवीन मित्र- मैत्रीणींमध्ये स्वतःचा वेळ गुंतवत आहेत. जास्तकरून ही मैत्री वर्च्युअल असते. एकटेपणाला कंटाळून आजकालची तरूणपिढी कोणासमोरही मनमोकळं करायला तयार असते. त्यांना फक्त त्यांचं म्हणणं ऐकणारं कोणी हवं असतं. नेमकी याच मानसिकतेमुळे अनेकदा चुकीच्या व्यक्तिंशी मैत्री होते. त्यामुळे ऑनलाइन मैत्री करण्यापूर्वी काही गोष्टींचा आधीच नीट विचार करून ठेवणं आवश्यक आहे.

याची विशेष काळजी घ्या की, तुम्ही तुमचे खासगी फोटो शेअर करणार नाहीत. मुलींनी आपले फोटो शेअर करण्यापूर्वी अनेकदा विचार करावा.

ज्या व्यक्तिशी चॅट करत आहोत त्याच्या बोलण्याने प्रभावित होत कोणतीही खासगी गोष्टही शेअर करू नका. जोवर एकमेकांवर विश्वास तयार होत नाही तोवर या गोष्टींची काळजी घ्या. सर्वसामान्यपणे ऑनलाइन मित्र हे कमी वेळात जास्तीत जास्त गप्पा मारण्याच्या आणि खासगी गोष्टी जाणून घेण्याच्या प्रयत्नांत असतात. या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करू नका.

सुरुवातीला कमी वेळ बोला. बोलायला सुरुवात करण्यापूर्वी त्यांचं प्रोफाइल, फोटो सर्व गोष्टी नीट पाहा. समोरची व्यक्ती खोटं प्रोफाइल ठेवून तर बोलत नाही ना याची पडताळणी करा.

ऑनलाइन फ्रेंडला भेटण्याचं प्लॅनिंग करत असाल तर सार्वजनिक ठिकाणीच भेटा. कमी वर्दळ असणाऱ्या ठिकाणी भेटण्याची समोरची व्यक्ती आग्रह करत असेल तरी तुम्ही स्पष्ट नकार द्या.

आपला मोबाइल नंबर सोशल साइटवर चुकूनही टाकू नका. कोणासोबतही नंबर शेअर करताना दोनदा विचार करा.

असे अनेक लोक आहेत जे लग्न करण्याचं आश्वासन देऊन मुलींना भेटतात आणि त्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात. त्यामुळे आपल्या आयुष्यातील एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी समोरची व्यक्ती तेवढी प्रामाणिक आहे की नाही हे पडताळून पाहा.

मैत्रीचं नाव सांगून अनेकदा पैसेही हडपले जातात. या गोष्टीचाही योग्य विचार करा.

Disclaimer- या लेखात दिलेली माहिती ही सर्वसामान्य आहे. न्यूज18 लोकमत याला दुजोरा देत नाही. वरील दिलेल्या गोष्टी अमलात आणताना तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या.

भगवान बुद्धाचे हे विचार बदलू शकतात तुमचं आयुष्य!

सावधान! या राशीचे प्रेमसंबंध आज तुटू शकतात

'या' सोप्या उपायांनी काही क्षणात दूर होतील डोळ्याखालची वर्तुळं!

VIDEO: पंचगंगा धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता, कोल्हापुरातल्या गावांना धोका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 12:20 PM IST

ताज्या बातम्या