Home /News /lifestyle /

जीवनशैली सुधारण्यास स्मार्टवॉच खरंच मदत करतात की फसवले जाताय? वाचा सविस्तर

जीवनशैली सुधारण्यास स्मार्टवॉच खरंच मदत करतात की फसवले जाताय? वाचा सविस्तर

आपल्या आरोग्याबाबत अनेक गोष्टी स्मार्टवॉचमुळे ट्रॅक करण्यास मदत होते. फीचर्सनुसार प्रत्येक स्मार्टवॉचची किंमत वेगवेगळी असते. पण खरोखरच स्मार्टवॉच महत्त्वाचं गॅझेट ठरतंय का?

  नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : बाजारात अनेक स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. सध्या स्मार्टवॉचचा ट्रेंड आहे. स्मार्टवॉचमध्ये व्हॉट्सअपच्या मेसेजेसपासून ते अगदी ईसीजी, हृदयाचे ठोके, किती पावलं चाललो, झोप अशा गोष्टी समजण्यापर्यंत अनेक फीचर्स मिळतात. आपल्या आरोग्याबाबत अनेक गोष्टी स्मार्टवॉचमुळे ट्रॅक करण्यास मदत होते. फीचर्सनुसार प्रत्येक स्मार्टवॉचची किंमत वेगवेगळी असते. पण खरोखरच स्मार्टवॉच महत्त्वाचं गॅझेट ठरतंय का? स्मार्टवॉचवर ईमेल, ट्विटर, व्हॉट्सअप बघता येतं. पण कामासाठी अगदी आवश्यक ठरतंच असं नाही. अनेकजण ईमेलला रिप्लाय करायचा असला, तर स्मार्टवॉचचा वापर करतातच असं नाही. आलेले मेसेज, ईमेल त्यावर वाचले जाऊ शकतात, परंतु रिप्लाय करताना मात्र मोबाईलवरून केला जात असल्याचं अनेक स्मार्टवॉच वापरकर्त्यांचं म्हणणं आहे.

  (वाचा - Apple watchच्या 'या' फीचरमुळे वाचले 61 वर्षीय भारतीय व्यक्तीचे प्राण)

  मात्र, फिटनेटसाठी दिलेल्या फीचर्समुळे हे स्मार्टवॉच फायद्याचं ठरतं. दररोजच्या अ‍ॅक्टिव्हिटीज सांभाळण्यासाठी, जॉगिंग सेशन रेकॉर्ड करण्यासाठी, अचूकपणे ट्रॅक करण्यासाठी उपयोगी आहे. ज्यांच्या हृदयाचा त्रास आहे किंवा फिटनेसविषयी अतिशय जागरुक असणाऱ्यांसाठी हे स्मार्टवॉच फायद्याचं ठरणार आहे. तसंच रोज फीट राहण्यासाठी काहीतरी करण्यासही हे स्मार्टवॉच प्रोत्साहित करत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

  (वाचा - आजपासून PUBG पूर्णपणे भारताबाहेर! कंपनीने Facebook पोस्टद्वारे दिली माहिती)

  स्मार्टवॉच खरेदी करावं का? या प्रश्नांची प्रत्येकानुसार हो-नाही अशी दोन्ही उत्तरं असतील. स्मार्टवॉच खरेदी करणं अगदी गरजेच नाही. पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षही करू नये. हे स्मार्ट वेअरेबल्स आपल्याला चांगल्या, निरोगी आरोग्यासाठी आपल्याला आश्चर्यकारकपणे जुळवून घेण्यास मदत करतात. त्यामुळेच हे एक आकर्षक गॅझेट ठरत आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Fitness

  पुढील बातम्या