नवी दिल्ली, 06 डिसेंबर : आपल्यापैकी अनेकजण आरोग्याच्या समस्या गंभीर होत नाहीत तोवर त्याकडे दुर्लक्ष करतात. फुफ्फुसाच्या आजारांच्या बाबतीतही अनेकदा असे होते. फुफ्फुस हा मानवी शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याद्वारे रक्तवाहिन्यांपर्यंत रक्त पोहोचवण्याचे काम होते. परंतु बहुतेक लोकांना फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत माहिती नसते. फुफ्फुसात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होण्याचा (Signs of Lung diseases) धोका असतो.
पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांनी IndianExpress.com मधील एका अहवालात म्हटले आहे की, फुफ्फुसांशी संबंधित कोणतीही आरोग्य स्थिती दर्शविणारी सौम्य लक्षणे क्वचितच दिसून येतात, ज्यामुळे नंतर स्थिती गंभीर बनते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी फुफ्फुसाच्या आजाराची लक्षणे (वॉर्निंग सायन्स) जाणून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
छातीत दुखणे
अचानक छातीत दुखण्याचा त्रास महिनाभर सतत जाणवत असेल किंवा त्याहून अधिक काळ टिकत असेल - विशेषत: श्वास घेताना किंवा खोकताना तीव्र दुखत असल्यास हे फुफ्फुसातील बिघाडाचे लक्षण आहे.
जास्त श्लेष्मा
श्लेष्मा, ज्याला कफ देखील म्हणतात. त्याचा जाड थर फुफ्फुसाच्या आत खोलवर उत्सर्जित होतो. तोंडाच्या किंवा घशाच्या आतील पातळ थुंकी नव्हे. श्लेष्मा रोगग्रस्त फुफ्फुस, पवननलिका आणि वरच्या श्वसनमार्गामध्ये हवेच्या हालचालीशी संबंधित आहे. जर तुम्हाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ श्लेष्मासह खोकला असेल तर ते फुफ्फुसाच्या आजाराचे लक्षण असू शकते.
हे वाचा - Health Tips : या वेळात स्प्राउट्स खाणे त्रासदायक ठरू शकते, जाणून घ्या योग्य पद्धत
अचानक वजन कमी होणे
पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा सांगतात की, जर कोणत्याही आहार योजना किंवा व्यायामाशिवाय तुमच्या वजनात लक्षणीय घट होत असेल तर तुमच्या शरीरात आत एक ट्यूमर वाढत असल्याची लक्षणे आहेत.
श्वासोच्छवासात बदल
जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते फुफ्फुसाच्या आजाराचे लक्षण असू शकते. फुफ्फुसातील ट्यूमर किंवा कार्सिनोमामधून द्रव जमा झाल्यामुळे हवेचा मार्ग अवरोधित होतो, ज्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होतो.
हे वाचा - Liquorice Uses : जेष्ठमधाचा वापर करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या, अन्यथा असा होऊ शकतो त्रास
रक्तासह सतत खोकला
आठ आठवडे किंवा त्याहून अधिक काळ खोकल्यातून रक्त येणे हे एक जुनाट आणि महत्त्वाचे प्रारंभिक लक्षण मानले जाते, जे तुमच्या श्वसन प्रणालीमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे दर्शवते. पोषणतज्ञ लवनीत बत्रा सांगतात की, या सर्व लक्षणांवर लक्ष ठेवा. त्यांना हलक्यात घेऊ नका आणि भविष्यात समस्या टाळण्यासाठी या गोष्टी तपासणे केव्हाही चांगले.
(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips