तुम्हाला चादरीत डोकं घालून झोपायची सवय आहे का? वेळीच व्हा सावध, नाहीतर...

तुम्हाला चादरीत डोकं घालून झोपायची सवय आहे का? वेळीच व्हा सावध, नाहीतर...

अनेकांना तोंड चादरीत घालून झोपायची सवय असते. पण ही सवय जेवढी लवकर मोडेल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण चादरीत तोंड घालून झोपणं हे धोकादायक आहे.

  • Share this:

येत्या काही दिवसांमध्ये थंडीला सुरुवात होईल. एकदा का थंडी सुरू झाली की अनेकांचे गरम कपडे, गोधडी, रजई अशी गरम अंथरूणं बाहेर येतील. पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत सर्व शरीर रजईत घालून झोपायला अनेकांना आवडतं. अनेकांना तोंड चादरीत घालून झोपायची सवय असते. पण ही सवय जेवढी लवकर मोडेल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण चादरीत तोंड घालून झोपणं हे धोकादायक आहे.

जर तुम्हाला थंडीत डोक्यावरून पांघरून घेून झोपायची सवय असेल तर याने डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. एवढंच नाही तर उलटी, चक्कर येणं, डोकं जड झाल्यासारखं वाटणं अशा समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. सकाळी उठल्यावर तुम्हालाही असं काहीसं वाटत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. अशा परिस्थितीत अनेकदा डॉक्टर खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांच्यामते, चादरीत तोंड घालून झोपल्यामुळे शरीराला आवश्यक तेवढा ऑक्सीजन मिळत नाही. यामुळे डोकेदुखी, अस्वस्थ वाटल्यासारखं होतं. ही समस्या एक- दोन दिवसांमध्ये ठिक होते.

जे लोक थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खोलीत हीटर किंवा ब्लोअरचा वापर करतात त्यांना अनेकदा डोकेदुखी, चक्कर येणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. यापासून वाचण्यासाठी शक्यतो खोलीत हवा खेळती राहील याकडे लक्ष द्या. याशिवा यबंद खोलीतच हीटरचा वापर करण्याकडे लक्ष द्या.

थंडीत शारीरिक हालचाल एरव्हीपेक्षा थोडी अधिक मंदावते. डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात वृद्धांच्या आतड्या सहजपणे आकुंचन पावतात. सर्दीमुळे हृदय आणि मेंदूसोबतच मूत्रपिंड आणि यकृतावरही होतो. अशावेळी तेलकट, भाजलेलं आणि मसालेदार जेवणं खाणं कमी केलं पाहिजे. या पदार्थांमुळे उलटी येणं आणि अपचनाचे आजार सुरू होतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

तुम्हाला सतत जांभया येतात का? तर या आजारांपासून रहा सावध!

CISF जवानाला हुंड्यात मिळाले 11 लाख रुपये, म्हणाला- 'मला पैसे नाही तर...'

शरीरातील या छोट्या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर...

सावधान! चहासोबत सिगारेट ओढणं आजच थांबवा, कारण...

Published by: Madhura Nerurkar
First published: November 16, 2019, 5:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading