नवी दिल्ली, 19 मे : जगभरातील प्रत्येक देश कोरोनाव्हायरस (Coronavirus) रोगावर लस (Vaccine) आणि औषध शोधण्यामध्ये व्यस्त आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला असताना अनेक रुग्ण बरेही होत आहेत. पण कोव्हिड-19 (Covid19) पासून बरे झालेल्या रूग्णांनाही डॉक्टरांनी सावधतेचा इशारा दिला आहे. कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांना डॉक्टरांनी 30 दिवस लैंगिक संबंध न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
डेली स्टारच्या मते, डॉक्टर म्हणाले की कोरोनाव्हायरस संसर्गाने बरे झाल्यानंतरही लोकांनी महिनाभर सेक्स टाळला पाहिजे. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, एका महिन्यात लैंगिक संबंध ठेवले असता जोडीदारास कोरोनाव्हायरसचा संसर्ग पसरण्याचा धोका आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पुरुषांच्या सीमेनमध्ये म्हणजेच वीर्यामध्ये संसर्ग बराच वेळ राहतो.
महाराष्ट्रात कोरोनाने गाठला 30 हजाराचा टप्पा, राज्यात एका दिवसात 67 मृत्यू
कोव्हिड-19 पासून बरे झालेल्या रूग्णांनी पार्टनसोबत महिनाभर संभोग थांबवावा. चीनच्या तज्ज्ञांचे मत आहे की, वीर्यसमुळे विषाणूची लागण होऊ शकते. त्यामुळे लोकांनी लैंगिक संबंध व मिठी-चुंबन टाळावे.
खरंतर, संशोधकांना असं आढळलं आहे की, कोरोनापासून बरे झालेल्या व्यक्तीच्या वीर्यमध्ये कोरोनाव्हायरस संसर्ग होता. चाचणी दरम्यान 38 रूग्णांवरमध्ये विषाणू आढळला. कोव्हिड-19 पासून 23 लोक बरे झाले. अशा परिस्थितीत चिनी शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, कोरोनाव्हायरस शरीरात बराच काळ अस्तित्वात असतो, जो लैंगिक संभोग दरम्यान पसरण्याची शक्यता असते.
पोलिसांच्या 'आशिर्वादा'ने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर खूनी खेळ, एकाची हत्या
आतापर्यंत जगात 4654991 लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. तर 309133 लोकांचा मृत्यू झाला आहे. एका बाजूला लसीवर क्लिनिकल चाचण्या सुरू असताना, कोरोनाव्हायरस संसर्गासंदर्भात दुसरीकडे वेगवेगळे अभ्यास केले जातात. एका अभ्यासात, कोव्हिड-19 रोगाच्या वेळी शरीरावर होणाऱ्या घातक दुष्परिणामांविषयी माहिती दिली जात आहे.
कोरोनानंतर आता पावसानं ओढावलं संकट, मुंबईत एकाचा मृत्यू तर 7 कुटुंब उघड्यावर
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.