देशातली ही चार सुंदर ठिकाणं एकदा तरी पाहाच, नाही तर होईल पश्चाताप

तुम्ही या शहरांना भेट दिली तर वैतागलेल्या मनाला एक वेगळी शांतता मिळेल. ही शांतता तुम्हाला पुन्हा जोमाने काम करण्यास प्रेरणा देईल यात काही शंका नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2019 08:56 PM IST

देशातली ही चार सुंदर ठिकाणं एकदा तरी पाहाच, नाही तर होईल पश्चाताप

तुम्हाला फिरायला, वेगवेगळ्या जागांना भेट द्यायला आवडत असेल तर अशा ठिकाणांना भेट द्या, जिथे जाऊन तुम्हाला मनःशांती मिळेल. गोंगाटापासून दूर जात स्वतःसोबत वेळ घालवण्याला प्राधान्य द्या. यात पुढील चार शहरांचा आवर्जुन विचार करा. कारण तुम्ही या शहरांना भेट दिली तर वैतागलेल्या मनाला एक वेगळी शांतता मिळेल. ही शांतता तुम्हाला पुन्हा जोमाने काम करण्यास प्रेरणा देईल यात काही शंका नाही.

केरळ- बॅकवॉटर, किल्ले, सुंदर समुद्र किनारे, नारळाची झाडं, सुंदर टुमदार गावं आणि चर्च या सर्व निसर्गरम्य गोष्टी पाहायच्या असतील तर एकदा तरी केरळला भेट द्याच. कारण इथे पाहिलेली एकही गोष्ट तुम्ही कधीच विसरणार नाहीत. केरळमध्ये कोणत्याही ठिकाणी गेलात तरी तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या प्रेमात पडाल.

वाराणसी- तुम्हाला ऐतिहासिक वास्तू पाहण्याची आणि आध्यात्माची आवड असेल तर या शहराला एकदा तरी भेट द्याच. इथे तुम्हाला अनेक अशी ठिकाणं दिसतील ज्याच्या तुम्ही प्रेमात पडाल. याशिवाय संध्याकाळची गंगा आरतीही चुकवू नका. फोटोग्राफीची आवड असेल तर हे शहर तुमचंच आहे. गंगा घाटावर सूर्योदय आणि सूर्यास्ताचे अनेक फोटो तुम्ही काढू शकता.

आगरा- आगऱ्यात जाऊन ताज महल नाही पाहिलात तर काहीच नाही पाहिलं. याचं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्यासारखा आनंद दुसरा कोणताच नसेल. आगऱ्याचा किल्लाही पाहण्यासारखा आहे आणि फोटोग्राफीची हौस असणाऱ्यांनी एकदा तरी या किल्ल्याला भेट द्यावी.

राजस्थान- इथले किल्ले, हवेली आणि कला पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येतात. कोणत्याही फोटोग्राफरला तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला राजस्थानला जाण्याचा सल्ला नक्कीच देतील. उदयपुर, जयपुर असो किंवा वाळवंट, फोटोग्राफीसाठी प्रत्येक जागा ही सुंदर आणि नयनरम्य आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...