सोशल डिस्टन्सिंग राखा पण एकटं पाडू नका; कोरोना काळात एकमेकांना असा द्या आधार

सोशल डिस्टन्सिंग राखा पण एकटं पाडू नका; कोरोना काळात एकमेकांना असा द्या आधार

कोरोना काळात अनेकांवर आर्थिक संकट कोसळलं आहे, अशा परिस्थितीत एकमेकांना मानसिक आधार देणं खूप महत्त्वाचं आहे.

  • Last Updated: Oct 21, 2020 08:48 PM IST
  • Share this:

कोरोना महासाथ आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचं नुकसान झालं आहे. विशेषत: मध्यम आणि निम्न वर्गासाठी हा खूप कठीण काळ ठरला आहे. ज्यांनी कर्ज घेतले त्यांच्यासाठी ईएमआय भरणंही कठीण होत आहे. अशा परिस्थितीत बरेच लोक मानसिकरित्या विचलित होत आहेत. सरकारने कर्जाबाबत सूट दिली असली तरी तितकं पुरेसं नाही. या लोकांना मानसिक आधाराचीही गरज आहे.

फोर्टिस आरोग्य सेवा येथील मेंटल हेल्थ अँड बिहेव्हिरल सायन्सेसचे संचालक डॉ. समीर पारीख यांनी सांगितलं, जे लोक मानसिकरित्या दुर्बल किंवा खचलेले आहेत त्यांना जास्तीत जास्त आधाराची गरज असते. त्यांना आर्थिक सहाय्य करणं आवश्यक नसतं. तर त्यांना कुटुंबातील सदस्यांकडून भावनिक आधाराची आवश्यकता आहे आणि हे काम संवादातून करता येतं. अडचणीत आलेल्या व्यक्तीनं बोललं पाहिजे आणि जर आपल्याला एखादी व्यक्ती अस्वस्थ वाटली तर आपणसुद्धा तिच्याशी बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे.

मित्र, कुटुंब, समाज महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात

डॉ. समीर पारीख पुढे म्हणतात, मित्र, कुटुंब आणि समाज या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मानसिकरित्या खचलेल्या लोकांना जितका आधार मिळेल तितक्या लवकर ते बरे होतील. ज्यांची नोकरी गेली आहे त्यांना त्यांची चूक नाही हे समजावून सांगायला हवं. कोणीही त्यांची क्षमता गमावलेली नाही. ही वेळ हा काळ कठीण आहे. हा देखील सरेल, मग नवीन नोकरी मिळेल आणि सर्वकाही आधीसारखं सामान्य होईल.

हे वाचा - सणाच्या काळात हँडशेक नको, आपला राम रामच बरा गड्या

एखाद्या स्वयंसेवी संस्थेला किंवा इतर कोठेही देणगी देण्यापेक्षा किंवा मदत करण्यापेक्षा आपल्या आसपासच्या लोकांना मदत करा. आपल्या कुटुंबात, मित्रांमध्ये आणि कॉलनीमध्ये काही समस्या आहे का ते पाहा. आपल्या सह कर्मचार्‍यांबद्दल विचार करा आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. काही अडचण आहे का ते विचारा. कधीकधी नैराश्याला बळी पडलेले लोक संवाद करणं टाळतात. मन व्यक्त करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत एखादा नातेवाईक किंवा मित्राने जर कॉल करून विचारलं, तर कदाचित ते त्यांच्या समस्या सांगू शकतील आणि आपण त्यावर काही उपाय शोधू शकू, असं डॉ. पारीख म्हणाले.

सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका

डॉ. समीर पारीख यांच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावरील बर्‍याच गोष्टी अनिश्चित आहेत. लोक नकळत संवेदनशील विषयांवर भाष्य करत असतात. एखाद्या आजारावर डॉक्टरांचं मत ऐका, अर्थव्यवस्थेच्या प्रश्नावर अर्थशास्त्रज्ञ काय म्हणतात ते ऐका, उर्वरित गोष्टींकडे दुर्लक्ष करणं सुरू करा.

हे वाचा - कोरोनाचं भय संपलं! व्हायरसपेक्षा लोकांना वाटतेय वेगळ्याच कारणाची भीती

myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. उमर अफरोज यांच्या म्हणण्यानुसार, आवडते पदार्थ खाणं किंवा आवडीचं काम करणं यामुळे नैराश्य कमी होतं हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे. जे चांगलं वाटेल त्या गोष्टी करा. वेळेवर झोपा, वेळेवर उठा. आपल्या आवडीचं संगीत ऐका. वाईट विचार स्वतःच निघून जातील. तसेच योग आणि प्राणायाम याचा अवलंब देखील खूप प्रभावी आहे.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख – मानसिक आजार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 21, 2020, 8:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading