फ्रिजमध्ये नका ठेवू 'हे' 12 पदार्थ !

फ्रिजमध्ये नका ठेवू 'हे' 12 पदार्थ !

पदार्थ ताजे, टवटवीत आणि खराब होऊ नये म्हणून सहजरित्या आपण फ्रिजचा वापर करतो. पण तुम्हाला माहित आहे का, असे काही पदार्थ आहेत जे फ्रिजमध्ये ठेवल्यानं आपल्या आरोग्याला मोठा धोका उद्भवू शकतो.

  • Share this:

मुंबई, 16 जून : फ्रिज हा आपल्या स्वयंपाक घरातील एक महत्वाचा घटक आहे. पदार्थ ताजे, टवटवीत आणि खराब होऊ नये म्हणून सहजरित्या आपण फ्रिजचा वापर करतो. पण तुम्हाला माहित आहे का, असे काही पदार्थ आहेत जे फ्रिजमध्ये ठेवल्यानं आपल्या आरोग्याला मोठा धोका उद्भवू शकतो. हो एका रिसर्चमधून हे समोर आलयं. तर जाणून घेऊया या पदार्थांबद्दल...

1) कलिंगड

कलिंगड कापलेलं असो किंवा नसो पण ते फ्रिजमध्ये ठेवणं खूप घातक ठरू शकते. २००६ला यु. एस. डिपार्टमेंट ऑफ ऐग्रिकल्चरने केलेल्या एका संशोधनातून असं समोर आलं आहे की, साधारण तापमानात ठेवण्याऐवजी फ्रिजच्या थंड तापमानात कलिंगड ठेवल्यास कलिंगडात मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सिडेंट्स तयार होतात. त्यामुळे कलिंगड फ्रिजमध्ये न ठेवणंच योग्य.

२) ब्रेड

फ्रिजच्या थंड तापमानात ब्रेड ठेवल्यामुळे ते एकदम कडक आणि सुकून जातं आणि पोटाचा आजार उद्भवतो. त्यामुळे शक्यतो ब्रेड बाहेरच ठेवा.

३) बटाटा

फ्रिजचे तापमान बटाट्याच्या स्टार्चला ब्रेक करतं, ज्यामुळे बटाटा गोड लोगतो. फुड स्टँडर्ड एजेंसीनुसार, फ्रिजमध्ये ठेवलेला बटाटा शिजवल्यास त्यात एक्रायलामाइट नावाचं हानिकारक केमिकल तयार होतो. त्याने कॅन्सरसारखे मोठे आजार उद्भवतो. त्यामुळे बटाटा फ्रिजमध्ये ठेवणं टाळा.

४) टोमॅटो

सगळेच खाद्यपदार्थ बनवण्यासाठी टोमॅटो लागतो. परंतु टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची चव आणि रंग निघून जातो. थंड तापमानामुळे टोमॅटोची

त्वचा लवचिक होते आणि त्यानंतर ते खाण्यायोग्य राहत नाहीत.

५) कांदे

कांद्याना फ्रिजमध्ये ठेवण्याची चुक कधीच करु नका. कारण, थंड वातावरणामुळे कांदे खराब होतात. कांद्यांना प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवल्यास ते हवेच्या कमतरतेमुळे खराब होऊन वापरण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे शक्यतो कांदे हे हवेच्या ठिकाणी ठेवा.

६) केचप आणि सॉस

बहुतेक वेळा सॉस आणि केचपमध्ये विनेगरचा वापर केलेला असतो. त्यामुळे त्याला फ्रिजमध्ये ठेवू नका.

७) कॉफी

कॉफीला हवाबंद डब्यामध्ये ठेवा. फ्रिजमध्ये कॉफी ठेवल्यास ती घट्ट होते.

८) मध

मध हे नैसर्गिक पदार्थ आहे. त्यामुळे त्याला फ्रिजमध्ये ठेवण्याची काही आवश्यकता नाही

९) ऑलिव्ह ऑइल

जर तुम्ही जेवण बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करत असाल तर त्याला फ्रिजमध्ये ठेवण्याची चुक करू नका. कमी तापमानामुळे ऑलिव्ह ऑइल बटरप्रमाणे घट्ट होते आणि त्याची चवसुद्धा खराब होते.

१०) लसूण

लसणाला कधीच फ्रिजमध्ये ठेऊ नका. कारण लसूण फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याला अंकुर फुटते आणि त्याची चव कमी होते. लसणाला नेहमी सुर्यप्रकाशापासून दुर ठेवा.

११) तुळशीची पानं

तुळशीची पानं फ्रिजमध्ये ठेवल्यास सुकून जातात. या सुकलेल्या पानांमुळे इतर पदार्थांनासुद्धा वास येतो. त्यामुळे तुळशीच्या पानांना एका ग्लासात पाणी घेऊन त्यात ती ठेवा.

१२) अंडी

अंडी बाहेर ठेवली तरी चालतात. परंतु ते एका आठवड्यात वापरात आणावी.

First Published: Jun 16, 2018 04:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading