शरीरात दिसत असतील ही लक्षणं, तर वेळीच व्हा सावध; असू शकतो पोटाचा कॅन्सर

शरीरात दिसत असतील ही लक्षणं, तर वेळीच व्हा सावध; असू शकतो पोटाचा कॅन्सर

पोटाच्या कर्करोगाची काही लक्षण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याशिवाय हा कर्करोग होण्यामागे काय कारणं असतात याचीही माहिती देणार आहोत.

  • Share this:

पोटात म्यूकसची निर्मिती करणाऱ्या पेशी या पोटाच्या कर्करोगासाठी कारणीभूत असतात. कर्करोगाच्या इतर प्रकारांप्रमाणे पोटाचा कर्करोग प्रभावित करणारा नसला तरी याची लक्षणं सहज समजून येत नाहीत. पोटाच्या कर्करोगाची काही लक्षण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याशिवाय हा कर्करोग होण्यामागे काय कारणं असतात याचीही माहिती देणार आहोत.

पोटाच्या कर्करोगाची सर्वसामान्य लक्षणं-

सतत उल्टी होणं आणि जीव कासावीस होणं

सतत छातीत जळजळणं

पोट फुगणं

शौचातून रक्त येणं

काविळ होणं

थोडंसं खाल्लं तरी पोट भरणं

नेहमीच थकल्यासारखं वाटणं

पोट दुखी काही खाल्ल्यानंतर अजून वाढणं

पोटाच्या कर्करोगाची कारणं-

अनेक गोष्टींमुळे पोटाचा कर्करोग होऊ शकतो. खाण्या- पिण्याच्या सवयी यासाठी कारणीभूत असतात. जास्तप्रमाणात लोणचं आणि रोस्टेड मीट खाणं. तसेच अनुवंशिकतेमुळेही पोटाचा कर्करोग होऊ शकतो. जर तुमच्या कुटुंबात कोणाला पोटाचा कर्करोग झाला असेल तर हा आजार तुम्हाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये पोटाचा कर्करोग होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

श्रद्धा कपूर आहे Physical Anxiety ने त्रस्त; नक्की हा आजार असतो तरी काय?

दररोज चहा प्यायल्याने नुकसान नाही तर होतात अनेक फायदे

या घरगुती उपायांनी काही दिवसांमध्ये पायाच्या भेगा होतील दूर

तुम्ही सतत सकाळचा नाश्ता चुकवता का.. तर हे एकदा वाचाच!

First published: September 15, 2019, 4:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading