मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

असह्य डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको; जीवघेण्या मेंदूच्या आजाराचं लक्षण

असह्य डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको; जीवघेण्या मेंदूच्या आजाराचं लक्षण

या आजाराचं वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास रुग्णाचा अचानक मृत्यूदेखील होऊ शकतो.

या आजाराचं वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास रुग्णाचा अचानक मृत्यूदेखील होऊ शकतो.

या आजाराचं वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास रुग्णाचा अचानक मृत्यूदेखील होऊ शकतो.

  • myupchar
  • Last Updated :
प्रत्येकाला कधीतरी थोडीशी डोकेदुखी जाणवतेच. जास्त धावणे किंवा तणाव यामुळे डोकेदुखी उद्भवू शकते, परंतु जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात इतकी तीव्र वेदना होत असेल की तिला डोकं फाटल्यासारखं वाटत असेल तर त्या व्यक्तीने या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. डोकेदुखीसह मान देखील आखडलेली वाटत असेल, तर हे हलक्यात घेऊ नका कारण ती व्यक्ती सेरेब्रल एन्युरिजम किंवा मस्तिष्क धमनीविस्फार या आजाराने ग्रस्त असू शकते. myupchar.com शी संबंधित डॉ. आयुष पांडे यांनी सांगितलं की, मेंदूच्या धमनीचा काही भाग फुगून रक्त भरतं, तेव्हा सेरेब्रल एन्युरिजम होतो. ही एक प्रकारची जीवघेणी स्थिती आहे, जी कोणत्याही वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकते. अशा परिस्थितीत ब्रेन स्ट्रोक, मेंदूला दुखापत देखील होऊ शकते. रुग्णाचा अचानक मृत्यू देखील होऊ शकतो. ब्रेन एन्युरिजमच्या बाबतीत डोकेदुखीसह मळमळ किंवा उलटी, प्रकाशाची संवेदनशीलता, अपस्मार, आखडलेली मान, स्नायूत कमकुवतपणा, शरीराचा कोणताही भाग हलवण्यात अडचण, अस्पष्ट दृष्टी, सुस्तपणा, बोलण्यात अडचण इत्यादी जाणवू शकतात. हा रोग 35 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांना प्रभावित करतो, मात्र काही बाबतीत हा आजार मुलांमध्येही दिसून येते. हे वाचा - पावसात डोळ्यांना संसर्गाचा धोका; अशी घ्या डोळ्यांची काळजी धमनीच्या भिंती पातळ झाल्यामुळे ब्रेन एन्युरिजम विकसित होण्यास वाव मिळतो. ते बहुधा रक्तवाहिन्यांच्या शाखांमध्ये किंवा छोट्या भागात होतात कारण रक्तवाहिन्यांचे हे भाग कमकुवत असतात. ब्रेन एन्युरीझम हा आजार बर्‍याच कारणांमुळे उद्भवू शकतो. अनुवंशिकता, उच्च रक्तदाब आणि असामान्य रक्त प्रवाह ही या आजाराची काही सर्वात प्रमुख कारणं आहेत. पुरुषांपेक्षा हे स्त्रियांमध्ये होण्याची शक्यता जास्त असते. डॉक्टर क्लिनिकल चाचणीसह सीटी स्कॅन आणि ब्रेन एन्जिओग्राफीद्वारे रोगाचा तपास करण्यास सांगतात. ब्रेन एन्युरिजमचा उपचार मेंदूतील एन्युरिजम्सचा कसा उपचार करावा यासाठी डॉक्टर रुग्णाचे वय, रोगाची स्थिती आणि आरोग्याची स्थिती पाहतात. जर एन्युरिजम लहान असेल आणि परिस्थिती फारशी गंभीर नसेल तर ते फुटण्याचा धोका नगण्य आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचे मार्ग शोधतात. एन्युरिजम मोठा असल्यास किंवा वेदना होत असल्यास शस्त्रक्रिया केली जाते. हे वाचा - पॅसिव स्ट्रेचिंग करा आणि हृदयरोग, मधुमेह टाळा जीवनशैलीतील काही बदल आणि घरगुती उपचार याचा धोका कमी करू शकतात. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे रक्तदाब तपासणे. myupchar.com शी संबंधीत एम्सचे डॉ. नबी वाली म्हणतात की उच्च रक्तदाब असेल तर शरीरात रक्तप्रवाह खूप वेगवान होतो. अशा परिस्थितीत हृदयाला अधिक काम करावं लागतं. हृदय रक्तवाहिन्याद्वारे शरीरात रक्त पंप करतं. रक्तवाहिन्या वाहून नेण्यासाठी विशिष्ट दबाव आवश्यक आहे. जेव्हा रक्तदाब जास्त असतो तेव्हा धमन्यांमधे दबाव वाढतो. या व्यतिरिक्त, निरोगी अन्नाचा समावेश आपल्या आहारात असावा ज्यामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, उच्च तंतुमय पदार्थ युक्त अन्न, दूध इत्यादींचा समावेश आहे. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - मेंदूच्या रक्तवाहिनीची अवाजवी वाढ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
First published:

Tags: Health, Pain

पुढील बातम्या