• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • खबरदार! ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना ‘लव्ह’, ‘स्विटी’, ‘हनी’ म्हणाल तर घरी बसण्याची येईल वेळ; जाईल नोकरी

खबरदार! ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना ‘लव्ह’, ‘स्विटी’, ‘हनी’ म्हणाल तर घरी बसण्याची येईल वेळ; जाईल नोकरी

ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यांना ‘लव्ह’ अशी हाक मारणं म्हणजे त्यांचा अपमान करणं आहे.

 • Share this:
  तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना (Pet Names To Female Employee) टोपण नावांनी बोलवत असाल तर ही सवय लगेच बदला. कारण ब्रिटनमधील मँचेस्टरमधील (Manchester) एका ऑफिसमध्ये काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्याला या सवयीमुळे नोकरीवरून काढून टाकण्यात (Man Suspended For Calling Colleague Love) आलं आहे. हा पुरुष कर्मचारी ऑफिसमधील महिलांना 'हनी', 'लव्ह', 'स्विटी' (Honey, Love, Sweety) अशा नावाने बोलवत होता, त्यामुळे त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. संबंधित पुरुष कर्मचाऱ्याने त्याला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर या प्रकरणाबाबत न्यायालयात (Manchester Court) धाव घेतली. मात्र, न्यायालयाने देखील ऑफिसचा निर्णय योग्य ठरवला आणि ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यांना अशा नावांनी हाका मारणं अपमानजनक असल्याचं सांगितले. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, ‘ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यांना ‘लव्ह’ अशी हाक मारणं म्हणजे त्यांचा अपमान करणं आहे. न्यायाधीश म्हणाले, ‘स्विटी’ आणि ‘बेब्ज’ सारखे शब्द स्रिला बदनाम करतात. या शब्दांचा महिलांसाठी वापर करणं चुकीचं आहे. हे शब्द वापरल्याबद्दल एका फ्यूनरल होमचे व्यवस्थापक माइक हार्टले यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली. माइकवर आरोप होता की, तो त्याच्यासोबत काम करणाऱ्या महिलांना अशा शब्दांनी हाक मारत असे, ज्यामुळे त्यांचा अपमान होत होता. हे वाचा - कसं शक्य आहे? नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार; शास्त्रज्ञही हैराण असा केला होता युक्तीवाद नोकरीवरून काढून टाकल्यानंतर माइकने याप्रकरणी मँचेस्टर न्यायालयात धाव घेतली होती. तेथे माइकच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला की, ‘तो फक्त महिलांनाच नाही, तर पुरुष कर्मचाऱ्यांना देखील ‘मेट’ आणि ‘पाल’ असे शब्द वापरून हाक मारीत होता. तो महिलांना इतर नावाने हाक मारत असला तरी त्यामागे त्याचा कोणताही वाईट हेतू नव्हता. त्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकणे चुकीचे असून न्यायालयाने त्याला नोकरीवर परत घेण्याचे आदेश कंपनीला द्यावेत. न्यायालयाने दिला हा निर्णय माइकच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर मँचेस्टर न्यायालयाने आपला निर्णय दिला. ‘स्त्री आणि पुरुषांसाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांची तुलना होऊ शकत नाही. एखाद्याला ‘मेट’ किंवा ‘लॅड’ म्हणणं हा अपमान नाही. ही टोपणनावं अपमानास्पद नाहीत. पण स्त्रिला ‘चिक’, ‘बेब्ज’, ‘हनी’ किंवा ‘स्विटी’ म्हणणं हा त्यांचा अपमान आहे. यामुळे, कंपनीचा निर्णय पूर्णपणे योग्य असून तो न्यायालय कायम ठेवत आहे. हे वाचा - व्यायाम हवाच; पण किती वेळ? जास्त व्यायाम केल्याने वाढतो हार्ट अटॅकचा धोका अनेक महिलांनी केली होती तक्रार कंपनीतील अनेक महिलांनी माइकविरोधात तक्रार केली होती. ऑफिसमध्ये माइक हा सर्वांसमोर ‘लव्ह’, ‘हनी’ अशी हाक मारत असल्याची तक्रार काही महिलांनी केली होती. ही तक्रार एचआर विभागाकडे करण्यात आल्यानंतर माइकला निलंबित करण्यात आलं. त्यावर, ‘मी कोणाचाही अपमान करीत नसून फक्त मैत्रीपूर्ण संबंध जोडत आहे,’ असे स्पष्टीकरण माइक याने दिले होते. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर, इतर कंपन्यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांना यासंदर्भात इशारा दिला आहे. त्यामुळे जर तुम्हाला देखील अशी सवय असेल, तर वेळीच सावध व्हा.
  First published: