नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हल्ली (lifestyle) लोकांच्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, लोक काहीही खातात आणि त्यासाठी कोणतीही निश्चित वेळ नसते. त्यामुळं त्यांना अनेक प्रकारचे शारीरिक त्रास (Physical distress) होऊ लागतात. तज्ज्ञांच्या मते, अवेळी खाण्याची पद्धत खराब जीवनशैलीचं लक्षण आहे. त्यामुळं थायरॉईड, मधुमेह (Diabetis) आणि उच्च रक्तदाबासारखे (High Bp) गंभीर आजार लोकांना जडत आहेत. असं दिसून आलंय की, अनेकदा लोक केवळ दिवसाच नाही तर, रात्री झोपण्यापूर्वीही असे पदार्थ खातात, ज्यामुळं हे आजार तर होतातच; शिवाय ते लठ्ठही होतात.
योग्य दिनचर्या आणि आहार यांची शिस्त पाळणं खूप गरजेचं आहे, असंही डॉक्टर आणि तज्ज्ञ सांगतात. आम्ही तुम्हाला अशाच पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे रात्री झोपण्यापूर्वी न खाणं चांगलं.
पचायला जड असलेलं अन्न
रात्रीचं जेवण जर पचायला जड असेल तर पोट जड होतं. शिवाय, अॅसिडिटी आणि इतर समस्या मागे लागतात. एवढंच नाही तर, पचायला जड अन्न खाल्ल्यानं लठ्ठपणाही वाढू लागतो. या अन्नामुळं झोपेवरही वाईट परिणाम होतो. रात्री झोपण्यापूर्वी हलकं अन्न खावं. तसंच, कोशिंबीर, कच्च्या भाज्या, सॅलड, फळं यांचा आपल्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे.
मैदा
दिवसा किंवा रात्री लोकांनी मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत. असे पदार्थ खाल्ल्यानं शरीराला लठ्ठपणा येतो. अनेकांना रात्रीच्या जेवणात पिझ्झा, पास्ता किंवा मैद्यापासून बनवलेले नान खायला आवडतात. याच्यामुळं लठ्ठपणा वाढतो. दुसरं म्हणजे हे जंक फूड असल्यामुळं त्यांचा शरीराच्या इतर भागांवरही वाईट परिणाम होतो.
हे वाचा - Fruits For Healthy Liver: लिवर निरोगी ठेवण्यासाठी ही 5 फळं आहेत गुणकारी; जाणून घ्या सर्व फायदे
शीतपेये
अनेकांना दिवसभरात कोणत्याही वेळी थंड पेय पिणं आवडतं. अशी पेयं रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्यास चरबी वाढते. याऐवजी 30 ग्रॅम प्रोटीन शेक प्यायल्यास ते शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरेल आणि त्यामुळं शरीरातील चरबी देखील बर्न होईल. तसंच, प्रथिनांमुळं स्नायूंना ताकद मिळते.
हे वाचा - Cold Water : पाणी पिताना अनेकजण ही एक चूक करतात; नंतर अनेक आरोग्य समस्या मागे लागतात
दारू पिऊ नका
बहुतेक लोकांना संध्याकाळी किंवा रात्री दारू पिण्याची सवय असते. ही सवय सोडणं इतकं सोपं नसलं तरी ती नक्कीच कमी करता येऊ शकते. दारू प्यायल्यानं शरीराला हानी पोहोचते. तज्ज्ञांच्या मते, दारूमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे झोपल्यानंतर शरीरात होणारा चयापचयाचा दर कमी होतो. अशा परिस्थितीत पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि हळूहळू लोकांचा लठ्ठपणा वाढू लागतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Weight, Weight loss