या भाज्या पावसाळ्यात खाऊ नका

या भाज्या पावसाळ्यात खाऊ नका

भाजीमंडईतही हिरव्या लुसलुशीत पालेभाज्या,फळभाज्या जास्त प्रमाणात पहायला मिळतात. आरोग्यासाठी त्या उपयुक्तदेखील असतात. पण या काळात त्यांच्याकडे जरा दुर्लक्ष केलं तर बरं.

  • Share this:

14 आॅगस्ट : पावसाळा जरी संपत आला असला तरी अजून पूर्णपणे संपलेला नाहीये.पावसाळ्यात आपल्याला जिकडे-तिकडे हिरवळ पहायला मिळते. भाजीमंडईतही हिरव्या लुसलुशीत  पालेभाज्या,फळभाज्या जास्त प्रमाणात पहायला मिळतात. आरोग्यासाठी त्या उपयुक्तदेखील असतात. पण या  काळात त्यांच्याकडे जरा दुर्लक्ष केलं तर बरं.

पावसाळ्यात या भाज्या नको रे बाबा

1. मशरुम-  अनेक वेळा मशरुम खाल्ल्यामुळे अनेक लोकांना अॅलर्जी होते. पावसाळ्यात मशरुम खाल्ल्यानं

आपल्याला त्रास होऊ शकतो.या मोसमात मशरुम खाणं टाळायला हवं.

2. फ्लॅावर-  पावसाळ्यात बटाटे,फ्लॅावर या भाज्यांकडे दुर्लक्ष करायला हवं. कारण या भाज्या पचनासाठी जरा जड असतात. जर या भाज्या पचल्या नाहीत तर पोटात जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते.

3. पालक आणि कोबी- पावसाच्या मोसमात पचनशक्ती कमजोर होत असते. पालक,कोबी या भाज्यांमध्ये या काळात छोटे-छोटे कीडे आढळतात.हे कीडे जर खाण्यात गेले तर पचन तंत्र खराब होऊ शकतं. यामुळे या भाज्या खाणं टाळलं पाहिजे.

4. सॅलड- या मोसमात कच्चं सॅलड खाणं टाळलं पाहिजे. कारण यात कीडे आणि बॅक्टेरिया असू शकतात. म्हणून सॅलड स्टीम करून खायला हवं.

First published: August 14, 2017, 1:19 PM IST

ताज्या बातम्या