तांब्यांच्या भांड्यांमध्ये चुकूनही ठेवू नका या गोष्टी, नाहीतर...

तांब्यांच्या भांड्यांमध्ये चुकूनही ठेवू नका या गोष्टी, नाहीतर...

आरोग्याबद्दल सध्या वेगवेगळ्या प्रकारे जागरुकता निर्माण होताना दिसत आहे. पण असं असलं तरी लोकं आजारीही तेवढ्याच प्रमाणात पडत आहे.

  • Share this:

आरोग्याबद्दल सध्या वेगवेगळ्या प्रकारे जागरुकता निर्माण होताना दिसत आहे. पण असं असलं तरी लोकं आजारीही तेवढ्याच प्रमाणात पडत आहे. असं म्हटलं जातं की, तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिण्याचे अनेक फायदे आहे. आजही अनेकजण तांब्याच्या भांड्यात जेवायला प्राधान्य देतात. यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. पण असेही काही पदार्थ आहेत जे तांब्याच्या भांड्यातून अजिबात खाऊ अथवा पिऊ नयेत. नेमकी कोणते पदार्थ खाऊ नयेत याबद्दल आज माहिती घेऊ.

लिंबाचा रस- तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं हे फायदेशीर आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. पण तांब्याच्या भांड्यात लिंबाचा रस प्यायल्यास आरोग्यासाठी धोकादायक असतं. लिंबात असलेले नैसर्गिक सायट्रिक अॅसिड तांब्यासोबत एकत्र होतं आणि त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो.

दही- दह्यात पोटाचे आजार बरे करणारे बॅक्टेरिया लॅक्टोबेसिलस असतात. पण जर दही तांब्याच्या भांड्यात ठेवलं तर त्याचा उलट परिणाम होतो. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेवू नयेत किंवा या भांड्यातून सेवन करू नये. यामुळे त्यातले सर्व पोषक तत्त्व तर नष्ट होतातच शिवाय उल्टी, अपचन, अतिसार यांसारखे पोटाचे विकार होतात.

लोणचं- तांब्याच्या भांड्यात लोणचं ठेवल्यास ते विषारी होतं. ते लोणचं खाल्ल्यास पोटात जळजळ, अॅसिडीटी, अपचन, अतीसार अशा अनेक समस्या निर्माण होतात. तांब्याच्या भांड्यात लोणचं ठेवल्यास ते लवकर खराब होतं. त्यामुळे लोणच्यासारख्या आंबट- गोड गोष्टी मातीच्या भांड्यात ठेवाव्यात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

कार्डियक अरेस्ट येतो कसा.. जाणून घ्या याची लक्षणं आणि कारणं

ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या जाचाला वैतागलाय... सुटकेचे हे आहेत स्मार्ट पर्याय

झोपण्यापूर्वी न विसरता प्या हळदीचं दूध, नाहीतर...

दिवसाची सुरुवात या विचारांनी करा, कधीच येणार नाही नैराश्य!

सेल्फीमुळे कळतील तुमची गुपितं, सांभाळून काढा PHOTO!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 04:07 PM IST

ताज्या बातम्या