मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तिखट खाल्ल्यानंतर तोंडाची आग शमवण्यासाठी चुकूनही पिऊ नका पाणी कारण...

तिखट खाल्ल्यानंतर तोंडाची आग शमवण्यासाठी चुकूनही पिऊ नका पाणी कारण...

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

पाणी प्यायल्यानंतरही तिखटामुळे तोंडाची झालेली आग कमी होण्याऐवजी वाढते.

मुंबई, 30 सप्टेंबर : दिवसेंदिवस लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलत आहेत. अनेकांना मसालेदार पदार्थ (Spicy foods) खायला आवडतात. पण ते खाताना अनेकांचं नाक, तोंड, डोळ्यातून पाणी निघू लागतं. कारण अति तिखट खाल्ल्याने तोंडाची आग होते आणि तोंडाची जळजळ कमी करण्यासाठी साहजिकच आपण सर्वजण सर्वात आधी पाणी पितो (Spicy food and water). पण तुम्हाला माहिती आहे का, तिखट खाल्ल्यानंतर कधीच पाणी पिऊ नये (Do not drink water after eating spicy foods).

खरं तर पाणी प्याल्याने तिखटपणा जायला किंवा कमी व्हायला हवा. प्रत्यक्षात असं होत नाही. उलट पाणी प्याल्यानंतर तिखटपणा आणखी वाढतो. असं म्हटलं जातं, की तिखट लागल्यानंतर पाणी पिणं हे तेलात पाणी मिसळण्यासारखं आहे. त्यामुळे अशा वेळी पाणी पिणं चांगलं नाही. यामुळे जळजळ अधिक वाढते. वास्तविक, याचं कारण पाणी नाही तर मिरचीच आहे. पाण्यामुळे आपल्याला आणखी काही काळ तिखटपणा जाणवतो. याचं नक्की काय कारण आहे? आणि तिखटपणा कमी करण्यासाठी काय करायला हवं, हे आपण जाणून घेऊ या.

हे वाचा - तोंडाची आग, जळजळ होतेय; किचनमधील फक्त 2 पदार्थांनी आराम मिळवा

मिरचीमध्ये असं काय आहे, की पाण्याने तिखटपणा कमी न होता तो वाढतो हे जाणून घेणं आवश्यक आहे. अमेरिकन केमिकल सोसायटीच्या माहितीनुसार, मिरचीमध्ये Capsaicin नावाचं एक रसायन आहे. हे Capsaicin यामागचं मूळ कारण आहे. Capsaicin मुळेच तिखटपणा वाढतो आणि जळजळ सुरू होते.

जिभेमध्ये TRPV1 पेन रिसेप्टर असतो. जेव्हा Capsaicin त्याच्या संपर्कात येतं, तेव्हा तो मेंदूला कळवतो, की जर तुम्ही असं काही खाल्लं असलं तर तुम्ही ते खाऊ नये आणि त्याचा पेन रिसेप्टरवर परिणाम होत आहे. यानंतरच तुमच्या नाकातून आणि डोळ्यातून पाणी येऊ लागतं आणि शरीरातून घामही येऊ लागतो.

पाणी नाही तर तोंडाची आग शमवण्यासाठी काय करावं?

Capsaicin मध्ये नॉन-पोलर रेणू असतात, जे केवळ ध्रुवीय रेणू असलेल्या पदार्थांद्वारे नष्ट केले जाऊ शकतात. पाण्याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. तुम्ही बर्फाच्या स्वरूपात प्रयत्न केला तरी त्याचा काही परिणाम होत नाही, उलट पाणी Capsaicin ला संपूर्ण तोंडभर पसरवतं .

हे वाचा - तोंडावर घाला आवार! जिभेचे चोचले पुरवल्याने अधिक वाढतात मासिक पाळीतील समस्या

अशा परिस्थितीत आपण दुग्धजन्य पदार्थ वापरू शकता. यामध्ये सर्वांत प्रभावी दूध आहे. खरं तर, दुधात ध्रुवीय नसलेले रेणू असतात, जे Capsaicin कमी करण्यास मदत करतात आणि आपल्याला तिखटापासून आराम देतात. याशिवाय, तुम्ही पाण्याऐवजी दुसरं काही तरी खाऊ शकता आणि त्यानंतर पाणी पिऊ शकता.

First published:

Tags: Food, Lifestyle