मुंबई, 02 मार्च : मासिक पाळीत (Menstrual period) बहुतेक महिलांना पोटात तीव्र वेदना होतात, अशा वेदनांपासून आराम मिळावा म्हणून अनेक महिला चहा पितात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, की ज्या वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही चहा पित आहात, तोच चहा तुमच्यासाठी हानीकारक ठरू शकतो. चहा प्यालल्याने तुमच्या पोटातील वेदना तर कमी होतात, मात्र पीरियड्समधील इतर समस्या वाढतात.
नवभारत टाइम्सने एका संशोधनाचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, चहामध्ये कॅफिने (Caffine) असतं. जे पीरियड्समध्ये महिलांच्या पीएमएसची (PMS) समस्या वाढवू शकतं.
हे वाचा - पीरियड्समध्ये तुमच्या या सवयी पडतील महागात, काही दिवसांसाठी जीवनशैली बदला
प्रीमेन्स्ट्रयुअल सिंड्रोम (premenstrual syndrome) हे मासिक पाळीच्या कालावधीत होतं. मासिक पाळीच्या कालावधीत विशेषत: मासिक पाळी येण्याच्या आधी महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात. चिडचिडेपणा वाढतो, मळमळ जाणवते, थकवा येतो आणि चहा प्यायल्याने या समस्या अधिक वाढतात. शिवाय ब्लड प्रेशर आणि हृदयाचे ठोकेही वाढतात.
ब्लॅक टीमध्ये सर्वात जास्त कॅफिने
ब्लॅक टी आपल्या सर्वांच्या घरी बनतो. हा चहा आरोग्यासाठी चांगला आहे, असं लोकांना वाटतं. मात्र मासिक पाळीत महिलांनी हा चहा पिऊ नये. यामध्ये कॅफिनेचं प्रमाण सर्वात जास्त असतं. एक कप ब्लॅक टीमध्ये 40 ते 60 मिलीग्रॅम कॅफीने असतं.
ग्रीन टीमध्येही असतं कॅफिने
ग्रीन टी आरोग्यासाठी चांगलं आहे, असं लोकांना वाटतं. मात्र यामध्येही कॅफिन असतं. शिवाय यामध्ये पॉलिफेनोलिक घटक असतो, जो शरीरात आयर्न शोषून घेण्यास मदत करतो. मात्र त्यामुळे आयर्नच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो.
दुधाचा चहाही चांगला नव्हे
चहामध्ये थिओफीलाइन हे रसायन असतं, जे पोटफुगीला कारणीभूत ठरतं. चहा प्यायल्यानंतर पोटात गॅस तयार होतो आणि शरीरातील पाणी कमी होऊ लागतं, म्हणजेच डिहायड्रेशन होतं. त्यातही तुम्ही दुधाचा चहा पित असला तर त्यातील कॅफिने आणि दूध यामुळे पोटात गॅस तयार होतं आणि पोटात असह्य अशा वेदना होतात.
हे वाचा - महिलांना दाढी येणं गंभीर आजारांचं लक्षण, 'ही' आहेत हनुवटीर केस येण्याची कारणं
खरंतर प्रत्येक प्रकारच्या चहामध्ये टॅनिक अॅसिड असतं, ज्यामुळे शरीरात आयर्न नीट शोषलं जात नाही. मासिक पाळीत असा चहा प्यायल्यात तर शरीरात आयर्नची अधिकच कमतरता होईल. शिवाय चहामधील कॅफिनेमुळे डोकेदुखी, चिडचिडेपणा, झोप न लागणं, चिंता, भीतीदेखील वाटेल. त्यामुळे शक्यतो मासिक पाळीत चहा टाळाच.
हे वाचा - महिलांनो Vagina Discharge बाबत तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.