Home /News /lifestyle /

जेवताना तुम्हीही करता का या चुका? नक्की टाळा, होऊ शकतात गंभीर परिणाम

जेवताना तुम्हीही करता का या चुका? नक्की टाळा, होऊ शकतात गंभीर परिणाम

या धावपळीच्या जगण्यात जेवणासाठी नीट वेळ काढणं आपल्याला क्वचितच शक्य होतं. अनेकदा व्यस्त दिनक्रमात जेवणासंबंधी चुकीच्या सवयीही आपल्या अंगवळणी पडतात.

    मुंबई, 4 जानेवारी : आपल्या शरीराच्या पोषणासाठी चांगलं जेवण (good food) अतिशय गरजेचं आहे. मात्र जेवण घेताना आपण  अनेकदा अशा काही चुका (mistakes) करतो ज्यामुळे त्या अन्नाचा पुरेपूर  मिळत नाही. शिवाय त्यातून आपलं आरोग्यही (health) बिघडू शकतं. हेल्दी डायट घेणं गरजेचं आहेच. पण त्यासोबतच हे नियमही (rules) पाळलेच पाहिजेत. शरीराला यातून दीर्घकाळ फायदा मिळेल. नव्या वर्षात या चुका नक्की टाळा. लगेचच फळ खाऊ नका. आपल्यापैकी अनेकांना जेवणानंतर वा जेवणासोबत फळ खाण्याची सवय असते. मात्र हे योग्य नाही. जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच फळ खाल्ल्याने त्याचा पूर्ण फायदा शरीराला मिळत नाही. हे फळ पचनासाठी नीटपणे आपल्या पचनसंस्थेपर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे लक्षात असू द्या, की नेहमी जेवल्यावर किमान तासाभरानेच फळं खा. अंघोळ अजिबात नको जेवल्यावर लागलीच अंघोळीला जाणे ही  तशी सामान्य गोष्ट आहे. मात्र असं अजिबात करू नका. जेवल्यावर लगेच अंघोळ केल्यानं पोटाच्या चारही बाजूनं रक्तप्रवाह वाढतो. त्यातून पचनक्रियेवर प्रभाव पडतो. परिणामत: जेवण नीट पचण्यात अडथळा येतो. लगेच झोपू नका जेवल्याजेवल्या लगेच झोपण्यात अनेकांना आनंद मिळतो. मात्र हे धोकादायक आहे. जेवण दुपारचं असो की रात्रीचं, जेवल्यावर लगेच झोपू नका. जेवल्यावर जेवण पचण्यास विशिष्ट वेळ लागतो. त्यामुळे लगेच झोपून जाऊ नका. यातून गॅसेस  किंवा आतड्यांचा संसर्ग होऊ शकतो. धूम्रपान नकोच तसं पाहता एरवीही स्मोकिंग करणं हानिकारक असत. मात्र जेवल्यावर लगेच स्मोकिंग केल्यानं ते अजूनच वाईट ठरतं. यातून आरोग्याला होणारा अपाय दहापट वाढतो. चुकूनही चहा नको जेवणानंतर चहा पिणे तसं अनेकांच्या अंगवळणी पडलेलं असतं. ही सवय तुम्हाला आजारी पाडू शकते. जेवनंतर लगेच चहा पिणं थेट पचनक्रियेवर परिणाम करतं. त्यामुळे जेवणानंतरच्या चहाला नाही म्हणणं शिका.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Food, Health, Smoking

    पुढील बातम्या