Home /News /lifestyle /

तुमचा नवरा जास्त गोड खातो तर त्याला डायबेटिस होणार का? काय आहेत तज्ज्ञाचं मत

सणासुदीच्या काळात तुमच्या घरात नवऱ्यानं जर गोडधोड पदार्थ खाल्ले तर मधुमेह म्हणजेच 'डायबिटीज' होऊ शकतो का?

  दिवाळी म्हटलं की गोडधोड पदार्थ खाणं आलं. नातेवाईकांकडून गोड खाण्यासाठी आग्रह देखील आला. त्यांच्या आग्रहाखात थोड थोड म्हणत खूप गोड खाल्लं जातं. अशावेळी अति गोड खाल्ल्यानं मधुमेहाचा धोका वाढण्याची भीती देखील असते.

  14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस म्हणून पाळला जातो. सणासुदीच्या काळात तुमच्या घरात नवऱ्यानं जर गोडधोड पदार्थ खाल्ले तर मधुमेह म्हणजेच 'डायबिटीज' होऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञांनी दिलं आहे.

  रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यानं मधुमेह होतो, त्यामुळे सर्वांना असं वाटतं की जास्त साखर किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने मधुमेह होतो.

  गोड पदार्थ आवडीनं आणि ताव मारून खाणाऱ्यांना अनेक जण मधुमेह होईल म्हणून सावध करतात. तर बहुतेक लोक मधुमेह होईल या भीतीनं चहामध्येदेखील कमी साखर घालतात.

  गोड जास्त खाल्ल्याने मधुमेह होतो हा एक मोठा गैरसमज आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं.

  तज्ज्ञांच्या मते, गोड पदार्थ किंवा साखर थेट मधुमेहाला कारणीभूत ठरत नाही, तर त्यामुळे उद्भवणाऱ्या इतर समस्या मधुमेह होण्यास कारणीभूत ठरतात.

  मधुमेह हा इन्सुलिनच्या कमतरततेमुळे होणारा चयापचय संस्थेतील बिघाड आहे. मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे म्हणाले, गोड पदार्थ खाल्ल्याने मधुमेह होतो असं नाही. गोड खाल्ल्याने कॅलरीजचं सेवन वाढतं, शरीरात कॅलरीज जास्त झाल्यास लठ्ठपणा बळावतो आणि लठ्ठपणामुळे मधुमेह होतो. त्यामुळे गोड पदार्थ हे अप्रत्यक्षरित्या मधुमेहाला कारणीभूत ठरतात.

  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  पुढील बातम्या