Diwali 2019: याहून सोप्या रांगोळी डिझाइन तुम्हाला Tiktok, Youtube शिवाय दुसरीकडे दिसणार नाहीत

Diwali 2019: याहून सोप्या रांगोळी डिझाइन तुम्हाला Tiktok, Youtube शिवाय दुसरीकडे दिसणार नाहीत

अभ्यंगस्नानापासून लोक घराची सजावट करतात. कोणी फुलांच्या हारांनी घराचं प्रवेश द्वार सजवतात तर काही आकर्षक रांगोळी काढून पाहुण्यांचं स्वागत करतात.

  • Share this:

दिवाळी 2019, दिवाळी रांगोळी डिझाइन, दिवाळी रांगोळी डिझाइन टिकटॉक व्हिडीओ (Diwali 2019): दिवाळीला आता काहीच दिवस उरले आहेत. 27 ऑक्टोबरला पहिली पहाट आहे. अभ्यंगस्नानापासून लोक घराची सजावट करतात. कोणी फुलांच्या हारांनी घराचं प्रवेश द्वार सजवतात तर काही आकर्षक रांगोळी काढून पाहुण्यांचं स्वागत करतात. घरातही आकर्षक पणत्या, कंदील लावून दिव्यांनी घर सजवलं जातं. तुम्हीही रांगोळीच्या वेगवेगळ्या डिझाइन सोशल मीडियावर शोधत असाल तर आता काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी सर्वात सोप्या रांगोळी डिझाइन घेऊन आलो आहोत.. सध्या Tiktok, Youtube वर दिवाळीशी निगडीत अनेक रांगोळी डिझाइन, वॉलपेपर ट्रेण्डमध्ये येत आहेत.

दिवाळीसोबतच अन्य सणांमध्येही मोराच्या रांगोळीला पसंती दिली जाते. मोराची रांगोळी काढताना तुम्ही नानाविध रंग वापरून तुमच्या कल्पनेला वाव देऊ शकता. तुमची ही रांगोळी पाहून घरी येणारा प्रत्येक पाहूणा खूश नाही झाला तरच नवलं.

टिकटॉकवर स्टीलचं झाकण आणि चहा गाळण्याच्या गाळणीने एक सुंदर रांगोळी साकारली जाऊ शकते. जर तुम्हाला रांगोळी काढता येत नसेल तर कोणतंच डिझाइन तुम्हाला जमणार नाही असं वाटतं पण असं काही नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही मनासारखी रांगोळी काढू शकता.

टिकटॉकवर तुम्ही स्टीलची रिंग, बांगड्या आणि खाण्याच्या फोर्कच्या मदतीने तुम्ही रांगोळी काढू शकता. या व्हिडीओची मदत घेऊन तुम्ही स्वतःची रांगोळी अजून सुंदर करू शकता. त्यातही ही रांगोळी काढायला अत्यंत सोपी आहे आणि विशेष म्हणजे दिसायला ती तेवढीच आकर्षक दिसते.

आता रात्रीची शिळी चपाती करणार मधुमेहावर उपचार, खायला विसरू नका!

या योगासनांच्या मदतीने करा पोटाची चरबी कमी, कधीही घ्यावी लागणार नाहीत औषधं!

आता खुशाल झोपा, कारण तुमच्या प्रत्येक समस्येवर हेच आहे उत्तर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 12:19 PM IST

ताज्या बातम्या