धनत्रयोदशीला खरेदीचा विचार करत असाल तर थांबा, चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका

धनत्रयोदशीला खरेदीचा विचार करत असाल तर थांबा, चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका

धनत्रयोदशीला लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करून सुख- समृद्धीसाठी आशीर्वाद घेतले जातात. तसेच या दिवशी नवीन गोष्टी विकत घेण्याची प्रथा आहे.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर- दिवाळीच्याआधी धनत्रयोदशी पर्व येतं. यावेळी 25 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. या दिवशी काही विशेष गोष्टींची खरेदी करणं आणि चांगल्या कामाची सुरुवात करणं शुभ मानलं जातं. धनत्रयोदशीला लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करून सुख- समृद्धीसाठी आशीर्वाद घेतले जातात. तसेच या दिवशी नवीन गोष्टी विकत घेण्याची प्रथा आहे. विकत घेतलेल्या गोष्टींची पूजा दिवाळीला केली जाते. पण यात अशाही काही गोष्टी असतात ज्या धनत्रयोदशीला विकत घेत नाहीत. नेमकी या कोणत्या गोष्टी त्याबद्दल आपण जाणून घेऊ.

लोखंडाची गोष्टी-

शक्यतो या दिवशी लोखंडाच्या कोणत्याही गोष्टी विकत घेऊ नये. असं म्हटलं जातं की, या गोष्टी आणणं अशुभ असतं. घरावर अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. तसेच कुटुंबातील व्यक्तींच्या संकटात वाढ होऊ शकते. यामुळेच धनत्रयोदशीला लोकंडापासून तयार करण्यात आलेल्या गोष्टी घरी आणू नये.

काचेचं सामान-

धनत्रयोदशीच्या दिवशी काचेच्या सामानाची खरेदी करू नये. असं म्हटलं जातं की, काचेच्या सामानाच्या खरेदीमुळे घरात अनेक वाईट गोष्टी घडू लागतात. तसेच समस्या कमी होण्याऐवजी वाढतात.

अॅल्युमिनिअमचं सामान-

लोह्याशिवाय धनत्रयोदशीला अॅल्युमिनिअमचं सामान विक घेऊ नका. याचा संबंधही राहूशी असतो. असं म्हटलं जातं की, अॅल्युमिनिअमचं सामान विकत घेतल्यावर घरात अशुभ घटना घडू लागतात. लक्ष्मी रुसते, त्यामुळेच धनत्रयोदशी शक्यतो वरील कोणत्याच गोष्टीची खरेदी करू नये.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

तांब्यांच्या भांड्यांमध्ये चुकूनही ठेवू नका या गोष्टी, नाहीतर...

छोट्या मुलीचा हा Video होतोय व्हायरल, बिग बींही झाले दिवाने

दिवाळीची खरेदी करताना या चुकांकडे लक्ष द्या, दुकानदार आता फसवू शकणार नाही

या सोप्या उपायांनी तुम्ही तोंडाच्या अल्सरपासून मिळवू शकता कायमची सुटका!

Published by: Madhura Nerurkar
First published: October 25, 2019, 3:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading