महाराजांच्या गडावर 18 वर्षांनी वाजला संबळ, हजारो दिव्यांनी उजळलेल्या राजगडावरचे पाहा PHOTOS

राजगडावरील पद्मावती देवीच्या मंदिरात रात्री गड जागर आयोजित केला होता. संबळाचा आवाज संपूर्ण मंदिरात घुमत होता, हा आवाज मंदिराने तब्बल 18 वर्षांनी अनुभवला.

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2019 09:57 PM IST

महाराजांच्या गडावर 18 वर्षांनी वाजला संबळ, हजारो दिव्यांनी उजळलेल्या राजगडावरचे पाहा PHOTOS

'पहिला दिवा त्या देवाला, ज्यामुळे मंदिरात देव आहेत' या वाक्याला अनुसरून गडझुंजार मावळे प्रतिष्ठान, सरहद परिवार व भटकंती गडदुर्गांची यांच्यातर्फे किल्ले राजगड वर दीपोत्सव आयोजित केला होता. या उपक्रमाचे हे सलग नववे वर्ष होते. (सर्व फोटो- अभिषेक कोंडे)

राजगडावरील पद्मावती देवीच्या मंदिरात रात्री गड जागर आयोजित केला होता. संबळाचा आवाज संपूर्ण मंदिरात घुमत होता, हा आवाज मंदिराने तब्बल 18 वर्षांनी अनुभवला. राजगड दीपोत्सव च्या निमित्ताने पुन्हा एकदा जुने वातावरणाची आठवण झाल्याची उपस्थितांनी नमूद केले.

दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा सण...या सणाला आपल्या घरी सजावट, दिवे लावण्याची प्रत्येकाची लगबग सुरु असते, मात्र या मावळ्यांची तर वेगळीच लगबग सुरु होती. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राहिलेल्या राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज, बलिदान देणारे अगणित मावळे यांचं स्मरण करण्यासाठी दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच वसुबारसला हा सोहळा आयोजित करण्यात येतो..!

या वर्षी देखील दीपोत्सव सोहळा मोठ्या आनंदात व जोशात पार पडला. दीपोत्सव सोहळ्यासाठी विविध भागातून 300हून अधिक शिवप्रेमींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे यात मुलींची संख्यादेखील लक्षणीय होती.

सर्वप्रथम राजगडावर स्वच्छता मोहीमेत सर्वांनी सहभाग घेतला. त्यानंतर रात्री पद्मावती देवीच्या मंदिरात जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते.

Loading...

रात्रभर देवीचा जागर मोठ्या उत्साहात घालण्यात आला, भंडाऱ्याची उधळण व संबळाच्या ठेक्यावर जोर-बैठका, सपाट्या घालत मावळ्यांनी देवीचा जागर केला. या वेळेस संपूर्ण मंदिर व परिसर भक्तिमय झाला होता. रात्री गडजागर झाल्यानंतर सर्वांना वेध होते, पहाटेच्या पालखी सोहळ्याचे..!

पहाटे फुलांनी सजवलेल्या आकर्षक पालखीत शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान करून, पद्मावती मंदिर-सदर-बिन्नी दरवाजा-पाली दरवाजा या मार्गने पालखी सोहळा संपन्न झाला. पालखी बिन्नी दरवाज्यात पोहचता भंडारा व फुलांची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळेस मशाली व भगवा झेंड्यांमुळे संपूर्ण वातावरण प्रसन्न झाले होते.

पद्मावती मंदिर, सदर, बिन्नी दरवाजा, पाली दरवाजा येथे भर पावसात फुलांची उत्कृष्ठ सजावट करण्यात आली होती. फुलांची आकर्षक सजावट आणि 3 हजारांहून अधिक पणत्यांची रोषणाईने संपूर्ण गड उजळून निघाला होता.

प्रतिष्ठानचे सर्व मावळे गेले २ महिने या दीपोत्सवाची तयारी करत होते. त्यांच्या प्रयत्नाचे चीझ झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 09:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...