दिवाळी 2019 : तुम्ही खरेदी करत असलेली मिठाई भेसळयुक्त तर नाही? कसं ओळखाल

तुम्ही खरेदी करत असलेली मिठाई, दूध किंवा पनीर भेसयुक्त आहे की नाही हे ओळखण्यासाठी खास टिप्स

News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2019 10:26 AM IST

दिवाळी 2019 : तुम्ही खरेदी करत असलेली मिठाई भेसळयुक्त तर नाही? कसं ओळखाल

मुंबई, 25 ऑक्टोबर: दिवाळी सर्वांचा आवडता सण. ह्या सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपण एकमेकांच्या घरी जाताना गोड पदार्थ, भेटवस्तू आवर्जुन घेऊन जातो. हल्लीच्या धावपळीच्या आणि गडबडीच्या रुटीनमध्ये मात्र घरी प्रत्येकवेळी गोड पदार्थ करणं होतंच असं नाही. बऱ्याचवेळा मिठाई बाहेरून विकत घेऊन भेट देण्यावर प्राधान्य दिलं जातं. सण म्हटला की बाजारपेठाही अगदी मिठाई, कंदील, रांगोळ्यांनी फुलुन जातात. खरेदीची लगबग सुरू होते. धनत्रयोदशीनंतर सुरू ते दीपावली. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारची मिठाई किंवा गोड पदार्थ घरोघरी विकत आणले जातात. अशावेळी पदार्थांमध्ये भेसळयुक्त पदार्थ आपण न पाहता घेतले तर त्याचे परिणाम गंभीर होतात आणि त्याशिवाय दिवाळी साजरी करण्यातली मजाही निघून जाते. त्यामुळे तुमच्या सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी उत्तम मिठाई आणि चांगल्या खव्याची मिठाई कशी निवडायची ह्याबाबत आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

बऱ्याचवेळा आपण खरेदी केलेली मिठाई ही शुद्ध असेल की नाही याबाबत काही माहिती सांगू शकत नाही. अनेकदा भेसळयुक्त मिठाई सर्रासपणे विकली जाते. अशावेळी चांगली आणि भेसळ नसलेली मिठाई निवडता य़ावी यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

खवा आणि सिंथेटिक दूध भेसळयुक्त आहे की नाही ते ओळखण्यासाठी त्यामध्ये आयोडीन सोल्यूशन आणि पॅराडीमेथील एमिनो बेनज़लडीहाइड सोल्यूशन टाकून पाहा. हे सोल्यूशन टाकल्यानंतर रंग बदलतो. त्यामुळे तुम्हाला खवा आणि दुधातील भेसळ समजण्यास मदत होते.

दूध आणि पनीरमध्ये स्टार्चचं किती प्रमाण आहे हे जाणून घेण्यासाठी एका काचेच्या बाऊलमध्ये थोडं पनीर किंवा मिठाई ठेवा. त्यामध्ये उकळलेलं पाणी टाका आणि थोडा वेळा एकजीव होईपर्यंत थांबा. एकजीव झाल्यावर त्यामध्ये चार ते पाच थेंब आयोडीन सोल्यूशन टाका. दुधामधील भेसळीची पारखही तुम्ही अशाच पद्धतीनं करू शकता.

मिठाई, दूध किंवा पनीरचा रंग बदलला आणि तो निळा झाला तर समजा की यामध्ये भेसळ करण्यात आली आहे. मात्र हा प्रयोग करूनही जर मिठाई, दूध किंवा पनीरचा रंग बदलला नाही तर समजा की तुम्ही घेतलेली मिठाई ही शुद्ध आणि भेसळ नसलेली आहे.

Loading...

काहीवेळा जादा नफा कमवण्याच्या नादात मिठाई, दूध किंवा पनीरवाले यामध्ये भेसळ करतात. बऱ्याचवेळा दुधामध्ये युरिया मिसळल्याचे धक्कादायक प्रकारही समोर आले आहेत. सणांमध्ये वाढलेली मागणी आणि मिळणारा नफा या दोन्हीचा विचार करून व्यापारी अशा प्रकारे भेसळ करतात. सगळेच व्यापारी करतात असंही नाही मात्र बाजारातून वस्तू घेताना ग्राहकांनी मात्र सतर्क राहाणं आवश्यक असतं अन्यथा ते जीवावरही बेतू शकतं.

खव्यामध्ये भेसळ आहे की नाही हे ओळखण्यासाठीही अशाच पद्धतीचा प्रयोग करावा लागेल.  एका वाडग्यामध्ये खवा आणि गरम पाणी घ्या. एकजीव होईपर्यंत थांबा.पराडीमेथील एमिनो बेनज़लडीहाइड सोल्यूशनचे काही थेंब टाका. यामध्ये जर युरियाची भेसळ असेल तर दुधाचा रंग बदलून पिवळा होईल. दुधाचा रंग बदलला नाही तर समजा की दूध शुद्ध आहे.

सणाचा आनंद लुटण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ मिठाई आवश्य खरेदी करा. पण भेसळयुक्त मिठाई खरेदी तर करत नाही ना? याकडेही थोडं लक्ष द्या ज्यामुळे आपल्या सणावर कोणतही विरजण पडणार नाही याची काळजी घेतली तर नक्कीच ही दिवाळी आनंदाची होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 10:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...