• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • भारतातली पहिली Solar City, संपूर्ण शहर चालतं सौर उर्जेवर!

भारतातली पहिली Solar City, संपूर्ण शहर चालतं सौर उर्जेवर!

सध्याच्या काळात जागतिक हवामान बदल (Climate Change), प्रदूषण, पाण्याचे (Water Resources) नैसर्गिक स्रोत संपत चालल्यानं वीज निर्मितीवर (Energy Production) होणारा परिणाम हे गंभीर प्रश्न जगाला भेडसावत आहेत.

  • Share this:
दीव, 13 ऑक्टोबर : सध्याच्या काळात जागतिक हवामान बदल (Climate Change), प्रदूषण, पाण्याचे (Water Resources) नैसर्गिक स्रोत संपत चालल्यानं वीज निर्मितीवर (Energy Production) होणारा परिणाम हे गंभीर प्रश्न जगाला भेडसावत आहेत. हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी भारतासह जगभरात जीवाश्म इंधनांचा वापर संपवण्यासाठी दबाव वाढत आहे. परंतु आजही भारतातील बहुतांश औष्णिक विद्युत केंद्रांमधील (Atomic Energy Centers) वीज कोळशापासून निर्माण होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पर्यायी ऊर्जा निर्मितीत महत्त्वाचा स्रोत ठरला आहे तो म्हणजे सौर ऊर्जा (Solar Power). आपल्या देशातही सरकार वीज निर्मितीसाठी पर्यायी स्रोतांनाही प्रोत्साहन देत आहे, यामध्ये सौर ऊर्जा प्रमुख आहे. देशभरात अनेक ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प (Solar Power Production Projects)उभे राहत आहेत. यातूनच देशातील एक संपूर्ण शहर सौर ऊर्जेवर चालवण्यात यश मिळालं आहे. हे शहर आहे दीव (Diu). तांत्रिकदृष्ट्या शहर नव्हे तर केंद्रशासित प्रदेश (Union Territory) असलेले हे शहर गेल्या काही वर्षांपासून दररोज शंभर टक्के सौरऊर्जेवर चालत आहे. गेल्या पाच वर्षांपासून या शहराला दिवसा सौर ऊर्जा पुरवली जात आहे. सुमारे दोन सौर उद्याने आणि 112 सरकारी संस्थाच्या छतावरील सौर प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज संपूर्ण शहराच्या दिवसातील ऊर्जेची गरज भागवत आहे. गुजरातच्या (Gujrat) दक्षिणेकडे असलेला दीव हा केंद्रशासित प्रदेश दमण आणि दीव अंतर्गत येतो, दोन्ही भौगोलिकदृष्ट्या वेगळे प्रदेश आहेत, परंतु प्रशासकीयदृष्ट्या दोन्ही एकाच संस्थेच्या अंतर्गत येतात. दीवचे प्रशासन थेट भारत सरकारच्या अखत्यारीत आहे. दिवसभर वीज फक्त सौर उर्जेपासून आज या 42 चौरस किलोमीटरच्या शहरात सुमारे 7 मेगावॅटची मागणी आहे. सर्व घरे, वातानुकूलित रिसॉर्ट्स, 60 बेडचे हॉस्पिटल, एअर कंडिशन असलेली सर्व सरकारी, बिगर सरकारी कार्यालये, आइस्क्रीम कारखाने, फिश वेअरहाऊस हे सगळं दीवमध्ये दिवसभर सौरऊर्जेवर चालते. दीवमध्ये ऊर्जा विभागाने दोन सौरउर्जा पार्क तयार केली असून तिथं 13 आणि 10 मेगावॅट क्षमतेची दोन सौर ऊर्जा संयंत्रे बसवली आहेत तर छतावरील यंत्रणा 3 मेगावॅट क्षमतेची आहे. हे सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आले तेव्हा त्यांची क्षमता त्या वेळेच्या मागणीच्या दुप्पट होती. त्यामुळे आताची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी हे प्रकल्प सक्षम आहेत.  India, Solar City, Solar Energy, Diu, Union territory, First Solar City of India, पूर्वी दीव ऊर्जा पुरवठ्यासाठी पूर्णपणे गुजरातवर अवलंबून होते. सौर ऊर्जेपासून होणारे वीज उत्पादन स्थानिक मागणीपेक्षा जास्त असेल तर गुजरातलाही वीज देता येते. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी किंवा ढगाळ दिवसांमध्ये सौर ऊर्जा निर्मिती कमी होते तेव्हा अन्य स्रोतांमधूनही ऊर्जा पुरवली जाऊ शकते. अशी संपूर्ण व्यवस्था दीवच्या ऊर्जा विभागाकडून करण्यात आली आहे. देशातील इतर भागाही आहेत जिथे सौर ऊर्जा निर्मिती करून स्थानिक विजेची गरज पूर्ण केली जाते तिथंही अशीच व्यवस्था आहे. Research, India, Solar City, Solar Energy, Diu, Union territory, First Solar City of India, दीवमध्ये 2013 मध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रयत्न सुरू झाले. दीवमधील बरीच जमीन नापीक आणि खडकाळ आहे. या जागा सरकारच्या ताब्यात आहेत. याचा फायदा घेत, पडीक तसंच लोकसंख्येची घनता कमी असलेली जमीन निवडण्यात आली. इथे उभारण्यात आलेली सौर उद्याने 2017मध्ये कार्यान्वित झाली. ही उद्याने शहराची दिवसभरतील विजेची मागणी पूर्ण करू शकत असल्याचे ऊर्जा विभागाला लक्षात आले. आज देशभरात कोळशाचा अपुरा पुरवठा आणि उपलब्धता यामुळे वीज निर्मितीवर परिणाम होत असल्याने वीज टंचाई जाणवत आहे, अशावेळी दीवचे उदाहरण वीज पुरवठा क्षेत्रात क्रांतीकारी ठरणार आहे. इतर शहरांमध्येही सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी अनुकूल परिस्थिती असेल तर असे प्रकल्प उभारून स्थानिक पातळीवर सौर ऊर्जेचे योग्य नियोजन आणि वापर केल्यास देशातील विजेची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकते.
First published: