काजू खाताय सावधान! या लोकांना ठरू शकतात त्रासदायक

काजू खाताय सावधान! या लोकांना ठरू शकतात त्रासदायक

काजू हेल्दी असले तरी काही समस्या असलेल्या लोकांसाठी ते हानीकारक ठरू शकतात.

  • Last Updated: Jul 13, 2020 07:27 PM IST
  • Share this:

सुकामेवा खायला आवडत नाही अशी व्यक्ती असणं दुर्मिळ आहे. विशेषतः काजू तर सर्वांनाच आवडतात. काजू फक्त चविष्टच नाही तर ते पोषक गुणांनी समृद्ध आहेत. नेहमीच उत्तम आरोग्यासाठी काजू खाण्याचा सल्ला दिला जातो. काजू तंतुमय तर असतातच पण त्यात प्रथिने, लोह यासोबत निरनिराळ्या प्रकारचे अँटीऑक्सीडेंट पण असतात. काजू कर्करोगाच्या रुग्णांसाठी फायद्याचे असतात. ते खाण्याने कमी रक्तदाबाची समस्या दूर होते. काजू मधुमेहाला नियंत्रणात ठेवतात.

myUpchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितल्यानुसार, काजू खाण्याने बुद्धी तल्लग होते. यातील मॅग्नेशियम मेंदूतील रक्तप्रवाह वाढवतात. हे सर्व चांगले गुण असले तरी काही अशा शारीरिक समस्या आहेत, त्या परिस्थितीत काजू खाणे हानिकारक ठरू शकते.

स्थूल लोकांनी काजू खाऊ नये

खूप स्थूल लोक ज्यांच्या शरीरात मेदाचे प्रमाण अधिक आहे त्यांनी काजू बिलकुल खाऊ नये. कारण काजूमध्ये चरबीचे प्रमाण खूप जास्त असते. एका संशोधनाप्रमाणे 30 काजूंमध्ये 163 कॅलरी असतात आणि 13.1 ग्रॅम चरबी असते. म्हणूनच ज्यांचे वजन आधीच जास्त आहे त्यांनी काजू खाण्यापासून स्वतःला दूरच ठेवले पाहिजे.

पोटाशी संबंधित त्रासात नुकसानदायक

पोटाशी संबधित आजार असलेल्या व्यक्तींनी काजू खाऊ नये. कारण त्यात मेदाचे प्रमाण अधिक असल्याने ते पचायला जड असतात. काजू तंतुमय असल्याने, वाताची समस्या पण उद्भवू शकते. अधिक काजू खाल्याने पोटात सूज येऊ शकते. ज्यांना बद्धकोष्ठता, वात, आणि पित्ताचा त्रास असेल अशा व्यक्तींनी काजू खाणं टाळावं

अर्धशिशीचा त्रास असणाऱ्यांनी काजू खाऊ नये

myUpchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्लाच्या मते, ज्यांना अर्धशिशीचा खूप त्रास आहे त्यांनी काजू खाऊ नये. काजूत आम्लाचे प्रमाण जास्त असते, त्याने डोकेदुखी अजून वाढते.

पित्ताशयात खडे असतील तर सांभाळा

ज्यांना पित्ताशयातील खड्यांचा त्रास आहे त्यांनी काजू खाण्यापासून दूर राहायला हवे. काजूमध्ये ऑक्सलेट्स असतात, त्याने या लोकांना त्रास होऊ शकतो. सर्वसाधारणपणे असे मानले जाते कि ज्यांचे कोलेस्ट्रॉल जास्त असते त्यांना पित्ताशयाच्या खड्यांची समस्या असते आणि काजूमध्ये पण मेद जास्त असतात त्यामुळे काजू पित्ताशयाचा त्रास वाढवू शकतात.

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी काजू न खाण्याचे पथ्य पाळावे

काजूमध्ये सोडियम अधिक असते म्हणून उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी काजू खाऊ नये. सोडियम रक्तदाब वाढवतो. अशा रुग्णांनी नियंत्रित प्रमाणातच काजू खावे.

काजू खाण्याची योग्य पद्धत

काजू तेलात तळून खाणे अतिशय चूक आहे. त्याने त्यातील पौष्टिक गुणधर्म नष्ट होतात. म्हणून काजू हलकेसे परतून घ्यावे हवे तर त्यात थोडे मीठ तुम्ही घालू शकतात. असे काजू खाणे उत्तम आहे.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - सकस आहार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 13, 2020, 7:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading