मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Health Tips: दुधाचा चहा पिताय? 'या' गंभीर आजारांचा करावा लागू शकतो सामना

Health Tips: दुधाचा चहा पिताय? 'या' गंभीर आजारांचा करावा लागू शकतो सामना

Health Tips: दुधाचा चहा पिताय? 'या' गंभीर आजारांचा करावा लागू शकतो सामना

Health Tips: दुधाचा चहा पिताय? 'या' गंभीर आजारांचा करावा लागू शकतो सामना

नेकांच्या दिवसाची सुरवात ही चहापासूनच होते. चहा घेतलं की शरीराचा थकवा दूर होतो. अशीच अनेकांची मानसिकता आहे. दिवसातून किमान चार ते पाच वेळा चहा पिल्याशिवाय अनेकांना जमत नाही. त्यातही आरोग्याची काळजी घेणारे (Health Tips)चहाप्रेमी ग्रीन टी, लेमन टी,ब्लॅक टी ला पसंती देतात. काही जणांना तर फक्त दूधातील तयार केलेला चहा प्यायला आवडतो. पण हा दुधातील चहा वाटतो तितका फायद्याचा (disadvantages of drinking tea)नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : अनेकांच्या दिवसाची सुरवात ही चहापासूनच होते. चहा घेतलं की शरीराचा थकवा दूर होतो. अशीच अनेकांची मानसिकता आहे. दिवसातून किमान चार ते पाच वेळा चहा पिल्याशिवाय अनेकांना जमत नाही. त्यातही आरोग्याची काळजी घेणारे (Health Tips)चहाप्रेमी ग्रीन टी, लेमन टी,ब्लॅक टी ला पसंती देतात. काही जणांना तर फक्त दूधातील तयार केलेला चहा प्यायला आवडतो. पण हा दुधातील चहा वाटतो तितका फायद्याचा (disadvantages of drinking tea)नाही.

वारंवार चहा पिणे योग्य नाही

दिवसातून अनेकदा चहा पिणे आरोग्यासाठी हानीकारक असू शकते. चहाच्या पानांमध्ये टॅनिन असते. त्यात उच्च आम्लीय कंटेन असतो. रिकाम्या पोटी किंवा जास्त प्रमाणात चहा पिला तर टॅनिन तुमच्या आतड्यांना इजा करू शकते.

त्यामुळे तुम्हाला पोटदुखी होऊ शकते.पोटात मुरडा मारून कळ येऊ लागली तर तुम्हाला दिवसभर अस्वस्थ वाटू शकते.

नैराश्य वाढवू शकते

दररोज दुधाचा चहा पिने किंवा त्यासोबत काहीतरी खाणे हा आपल्या दिवसाचा आरामदायी शेवट असू शकतो. मात्र, संशोधनानुसार स्वादिष्ट पेय प्यायल्याने नैराश्यात वाढ होऊ शकते. हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये झालेल्या संशोधनानुसार चहामध्ये असलेले कॅफिन सेवन केल्याने माणूस चिडचिडा होतो.

तुम्हीसुद्धा कानातील मळ काढण्यासाठी Ear buds वापरता का? मग हे वाचाच

तुम्ही चिंताग्रस्त असाल तर तुमच्या शरीराला तसेच तयार करण्याची प्रकिया सुरू राहू शकते. कॅफिनमुळे ह्रदयगतीही वाढू शकते. त्यामुळे अस्वस्थ वाटू शकते.

वजन कमी करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना धोका

चहामध्ये खूप कमी कॅलरी असतात मात्र, त्यात अशी रसायने असतात की त्याचा उपयोग उर्जेची मात्रा वाढविण्यासाठी त्याची ओळख आहे. कमी कॅलरीचे हे पेय वास्तवात तुमच्या कॅलरी बर्न करण्याचे काम करण्यास मदत करू शकते.

तिखट खाल्ल्यानंतर तोंडाची आग शमवण्यासाठी चुकूनही पिऊ नका पाणी कारण...

टी रिसर्च असोसिएशन इन इंडिया यांच्याद्वारे केलेल्या अभ्यासानसार जेव्हा चहात दूध मिसळले जाते तेव्हा दुधातील प्रोटीन चहातील संयुगांमध्ये मिसळते तेव्हा वजन वाढण्याची शक्यता असते.

दुधाच्या चहामुळे चयापचय क्रीया मंदावते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे तुमच्यासाठी योग्य पेय नाही.

निद्रानाशासारखे आजार होण्याची शक्यता

तरतरी यावी म्हणून आपण नेहमी चहा पितो. ऑफिसमध्ये कंटाळा आला की, चहा मागवला जातो. अनेकांना सिगारेटबरोबर चहा पिण्याची सवय असते. मात्र, ही सवय धोकादायक ठरू शकते. चहामध्ये ४७ मिलिग्राम कॅफिन असते. त्यामुळे आपल्या झोपेचे खोबरे होऊ शकते.

निद्रानाशासारखे आजार होण्याची शक्यता असते. दुधाचा चहा पिल्याने १५ मिनिटांनी कॅफिन रक्तात मिसळते आणि तरतरी येते. मात्र, त्यामुळे जर झोपण्याआधी तुम्ही चहा पित असाल तर लवकर झोपण्याचे स्वप्न पाहू नका.

संध्याकाळी तुम्हाला दुधाचा गरम चहा छान वाटू शकतो. मात्र, रात्री तुम्हाला अस्वस्थ करू शकतो.

टाइप2 चा मधुमेह वाढू शकतो

तुम्ही जर दररोज भरपूर चहा पित असाल तर तुम्हीच विचार करा की, चहात किती साखर घातली असेल.खूप प्रमाणात चहा पिल्याने आणि त्यावाटे साखरेचे सेवन केल्याने रक्तात साखर वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला टाइप २ मधूमेह होऊ शकतो. साखरेचे प्रमाण वाढल्याने अन्य आजारही वाढू शकतात.

First published:

Tags: Tea, Tea drinker